जळगाव(प्रतिनिधी) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडी पथकाने अटक केल्याच्या निषेधार्थ आज जळगावात शिवसैनिक आक्रमक झालेली बघावयास मिळाली. यावेळी जळगाव महानगरपालिकेच्या आवारात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
तब्बल ७ तासाच्या चौकशीनंतर ईडीच्या पथकाने शिवसेना नेते संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केली होती. याच्याच निषेधार्थ जिल्हा व महानगर शिवसेनेकडून जळगाव महानगरपालिकेच्या आवारात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्वात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे व महानगराध्यक्ष शरद तायडे यांनी केले. केंद्र सरकार व ईडी विरोधात जळगाव महापालिकेचा मुख्य इमारतीसमोर घोषणाबाजी करत सेना पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊतयांना समर्थन केले. केंद्र सरकार इडीच्या माध्यमातून हेतू पुरस्कर कारवाया करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. यावेळी शिवसेनेकडून काळ्या फिती बांधून निषेध करण्यात आला.
















