नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्ण संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाख १४ हजार ४६० कोरोना रुग्णांची भर पडली असून २६७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत देशातील १.८९ लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत एक लाख १४ हजार ४६० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर १ लाख ८९ हजार २३२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. याच कालावधीत देशात दोन हजार ६७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या १४ लाख ७७ हजार ७९९ रुग्ण उपचाराधीन असून, कोरोना बळींची एकूण संख्या तीन लाख ४६ हजार ७५९ वर पोहोचली आहे.
२४ तासांत आढळून आलेले नवी रुग्ण – १,१४,४६०
२४ तासांत रुग्णालयातून घरी परतलेले रुग्ण – १,८९,२३२
२४ तासांत झालेले मृत्यू – २६७७
देशातील एकूण रूग्ण – २,८८,०९,३३९
कोरोनातून बरे झालेले एकूण रुग्ण – २,६९,८४,७८१
एकूण कोरोनाबळी – ३,४६,७५९
देशात उपचाराधीन असलेले एकूण रुग्ण – १४,७७,७९९
आतापर्यंत लसीकरण झालेल्यांची संख्या – २३,१३,२२,४१७
राज्यातली स्थिती
राज्यात शनिवारी १३ हजार ६५९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज २१ हजार ७७६ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शनिवारी ३०० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण १,८८,०२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण ५५,२८,८३४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०१ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात १४,००,०५२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.