नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास ४ हजारांनी घट झाली. गेल्या २४ तासांत ३२ हजार ९३७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ४१७ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासात ३२ हजार ९३७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. देशात काल दिवसभरात ४१७ मृत्युंची नोंद झाली. देशात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी २२ लाख २५ हजार ५१३ वर गेला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी १४ लाख ११ हजार ९२४ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४ लाख ३१ हजार ६४२ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. ३ लाख ८१ हजार ९४७ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
देशात काल दिवसभरात १७ लाख ४३ हजार ११४ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. त्यापैकी १२ लाख ७२ हजार ८२९ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ४ लाख ७० हजार २८५ इतकी आहे. त्यामुळे आता लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या ५४ कोटी ५८ लाख ५७ हजार १०८ वर पोहोचली आहे.