नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत १ हजाराने घट झाली आहे. गेल्या २४ तासांत ४२ हजार ७७६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार २०६ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४२ हजार ७७६ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर १ हजार २०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४५,२५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशात ३,०७,९५, ७१६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २,९९,३३,५३८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. ४,०७,१४५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ४,५५,०३३ कोरोना बाधित रुग्ण आहे.
भारतात आतापर्यंत ३७ करोडपेक्षा अधिक कोरोना डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात गेल्या २४ तासांत २७ लाखापेक्षा अधीक लसींचे डोस देण्यात आले आहेत.