नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास ६ हजारांनी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ४३ हजार २६३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३३८ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशामध्ये ४३ हजार २६३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ९३ हजार ६१४ झाली आहे. आत्तापर्यंत देशातल्या तीन कोटी ३१ लाख ३९ हजार ९८१ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे.देशात गेल्या २४ तासांत ४० हजार ५६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता तीन कोटी २३ लाख ४ हजरा ६१८ वर पोहोचली आहे. काल दिवसभरात देशात ३३८ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे मृतांचा आकडा आता चार लाख ४१ हजार ७४९ वर पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासांत ८६ हजार ५१ लाख ७०१ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यामुळे देशातल्या लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या ७१ कोटी ६५ लाख ९७ हजार ४२८ झाली आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात बुधवारी ४,१७४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी राज्यात ४ हजार १५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ८ हजार ४९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०९ टक्के आहे.