जळगाव (प्रतिनिधी) बनावट कंपनीच्या ऑनलाईन खोटे ईलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बघून एक ६१ वर्षीय वृद्ध बळी पडल्यामुळे त्यांची तब्बल १ कोटी ४४ लाख २६ हजार ११६ रुपयात फसवणूक झालीय. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वासुदेव रामदास महाजन (रा.किरण लेकसाईड रेसिडेन्सी, शिसोली रोड, जळगाव), असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
वासुदेव महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी ते आज पावेतो नाशिक व कोलकत्ता येथे नमुद असलेली ग्रोथ ट्रेड इंडिया (दि मार्क ट्रेडस) चे वर उल्लेख केलेले श्रीमती आयशा (पुर्ण नाव माहित नाही), विष्णु अग्रवाल, श्रीमती रिचा गुप्ता, श्री.अंगदसींग ऊर्फ अरुण (पुर्ण नाव माहित नाही) असे नावे असलेल्या व्यक्तींनी Growth Trade India (दि मार्क ट्रेडस) या नावे एक खोटी व बनावट कंपनी संगणकाच्या माध्यमातुन उभी केली. त्यावर सारे खोटे ईलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार केले. ते रेकॉर्ड इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना फसविण्यासाठी प्रसारीत केले. या खोटे पणाला व लबाडीला आपण बळी पडलो. वरील लोकांनी श्री. महाजन यांना वेळोवेळी शेअर ट्रेडींगमध्ये फायदा झाल्याचे खोटे सांगून पैसे देण्यास उदयुक्त केले. या फसवुणकीला बळी पडल्यानंतर श्री. महाजन आतापर्यंत वरील लोकांना १ कोटी ४४ लाख २६ हजार ११६ रुपये एवढी रक्कम वेळोवेळी दिली.
तसेच त्यांनी श्री. महाजन यांच्या वतीने केलेल्या व्यवहारात एकुण मिळवली. ती रक्कम आज देतो, उदया देतो, असे अनेकदा सांगुन त्यांनी दिली नाही. अशा प्रकारे फसवणुक केली. तसेच खोटे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार केले. या शिवाय वरील लोकांनी इंटरनेटचा वापर करुन एक मोठे आर्थिक आफरातफरीचे रॅकेट चालविले आहे. ज्याव्दारे अनेक लोकांची करोडो रुपयांची फसवणूक व अफरातफर झाली आहे. हा अत्यंत मोठया रकमेचा व गंभीर आर्थिक गुन्हा असून आपल्याला ७ कोटी ६८ लाख ७९ हजार ५१८ एवढी रक्कम नफा मिळाल्याचे व तो प्रत्यक्ष देऊ असे सांगीतले होते, असेही फिर्यादीत श्री. महाजन यांनी म्हटले आहे. याप्रकरणी श्रीमती आयशा (पुर्ण नाव माहित नाही), विष्णु अग्रवाल, श्रीमती रिचा गुप्ता, श्री.अंगदसींग ऊर्फ अरुण (पुर्ण नाव माहित नाही), या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. जयपाल हिरे हे करीत आहेत.