अमळनेर (प्रतिनिधी) न. पा. च्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या जिजाऊ महिला जिमखाना व सावित्रीबाई फुले वाचनालयाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले.
अमळनेर नगरीचे विकास पुरुष माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व नगराध्यक्षा कृषिभूषण पुष्पलता पाटील यांच्या संकल्पनेतील जिल्ह्यातील प्रथम जिजाऊ महिला व्यायामशाळा व सावित्रीबाई फुले अभ्यासिका, योगा हॉल ची निर्मिती चे स्वप्न न पा निधीच्या माध्यमातून शहरातील स्टेट बँक वरील मजल्यावर साकार झाल्याने त्याचे उद्घाटन दि 1 नोव्हेंबर रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व विधानसभा माजी सभापती अरूणभाई गुजराती यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. सदर व्यायाम शाळेत एकावेळी साठ जण व्यायाम करू शकतात तर अभ्यासिकेत 60 विद्यार्थिनी बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. व्यायामशाळेत 5 इलेक्ट्रिकल व 5 मेकॅनिकल असे दहा ट्रेडमिल स्पिनिंग बाईक, 1 रीकबेंट बाईक,1 कॉसफीट, 1 टायफ्लिप, 1 अब्स कोस्टर,1 कमशियाल, 4 स्टेशन मल्टी जिम असे एकूण 35 विविध व्यायाम उपयुक्त अत्याधुनिक साहित्य महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे
उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करतांना सांगितले की, तीस – पस्तीस वर्षाच्या राजकारणातील जवळ – जवळ 25 वर्षापासुन आमची नगरपालिकेत सत्ता आहे पण असा उपक्रम मला माझ्या आयुष्यामध्ये बघायला मिळाला नाही. मुंबईमध्ये मोठ्या शहरांमध्ये असे उपक्रम बघायला मिळतात. महिला नगराध्यक्ष असल्यानेच हे शक्य झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के महिला आपली सुरक्षा करतात. महिलांनी आपली सुरक्षितता करण्याकरता या ठिकाणी योगा व व्यायाम करावयास संधी मिळणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जनतेशी नाळ जोडलेली असल्यानेच कृषिभूषण साहेबराव पाटील व पुष्पलता पाटील यांनी सदर वास्तूची निर्मिती करून एक आदर्श निर्माण केला आहे. जळगांव जिल्ह्यात 50 टक्केच्या वर महिला अधिकारी आहेत आणि त्याच्यामुळे न पा अधिकारी यांच्या लक्षात आले की आमच्या सारख्या कोणीतरी पुढे आले पाहिजे आणि त्यांनी काम केलं पाहिजे, मुलींकरता अभ्यासिका उद्घाटन करण्यात आलं, मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आहे आपलं कुटुंब आपली जबाबदारी ही पाळण्याची आता पुढच्या काळामध्ये गरज आहे. योगायोगाने एवढे लोक कधीच जमत नाही आज एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला एवढे लोक आज जमलेल्या माझ्या आठ नऊ महिन्याच्या कारकिर्दीमध्ये हा सगळ्यात मोठा कार्यक्रम असेल. नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा अभिनंदन करतो. संपूर्ण राज्यातील न पा च्या माध्यमातून हा उपक्रम कसा राबविला जाईल, याकरिता प्रयन्तशील राहील, असे म्हणत सदर कामाचे कौतुक केले.
याप्रसंगी विधानसभा सभेचे माजी अध्यक्ष अरुनभाई गुजराथी, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र भय्या पाटील, माजी आमदार तथा अमळनेर नगरीचे विकास पुरुष साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, अमळनेर प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, खाशीचे योगेश मुंदडे, न पा मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड, विनोद भय्या, डॉ. अपर्णा मुठे , उपनगराध्यक्ष विनोद लांबोडे, उप मुख्याधिकारी संदिप गायकवाड यांच्यासह विविध प्रभागाचे नगरसेवक, न पा अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिगंबर महाले सरांनी केले. तर आभार संजय चौधरी यांनी मानले.
सादर कार्यक्रम हा पूर्ण पणे कोरोना प्रतिबंधनात्मक नियमांचे काटेकोर पणे पालन करून संपन्न झाला. शारीरिक अंतर राखुन बैठक व्यवस्था करण्यात आली होती तर कार्यक्रमात प्रवेश करते वेळीच सॅनिटाईझर व मास्क तसेच तापमान मोजण्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती. म्हणून या कार्यक्रमाबाबत उपस्थितांनी भरभरून कौतुक केले.