धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाला दोन वर्ष पूर्ण झाल्यामुळे लोकनाट्यद्वारे महाराष्ट्र शासनाच्या विविध विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहचवावे यासाठी आज धरणगाव तालुक्यातून या कलापथकाद्वारे उदघाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाला दोन वर्ष पूर्ण झाल्यामुळे लोकनाट्य द्वारे महाराष्ट्र शासनाच्या विविध विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विनोद ढगे जळगाव व त्यांचे सहकारी कलापथकाद्वारे धरणगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन महाराष्ट्र शासनाने महाविकास आघाडी सरकारने या दोन वर्षाच्या कालखंडात केलेले विविध विकास कामे, त्यात प्रामुख्याने कोरोना सारख्या विषाणूने पूर्ण जगाला वेढा घातलेला होता अशा परिस्थितीत शासनाने गरजूंना अन्नधान्य पुरवठा असेल आरोग्य सुविधा,असतील लसीकरण, असेल अशा विविध प्रकारच्या सुविधा पुरवण्यात आल्या शेतकऱ्यांसाठी पिक विमा असेल अनेक भागांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी मदत करण्याचे काम, दिव्यांग बांधवास,विधवा, असतील परित्यक्ता असतील गरजु असतील त्यांना शासनाच्या विविध योजनेद्वारे मदतीचे कार्य असेल रस्तेदुरुस्ती असतील पाणी पुरवठा योजनेअंतर्गत घर देते नळजोडणी असेल असे विविध विकास कामे शासनाने केले. सर्व जनतेपर्यंत पोहचवावे यासाठी आज धरणगाव तालुक्यातून या कलापथकाद्वारे उदघाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी जळगाव जिल्हा शिवसेना उपप्रमुख तथा महाराष्ट्र ग्रंथालय सेनेचे महाराष्ट्र उपप्रमुख पी एम पाटील, दामू अण्णा पाटील, माजी सभापती सचिनभाऊ पाटील, रविंद्र जाधव, हेमंत चौधरी, शरद पाटील विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.