TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेचे थाटात उद्घाटन

जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांची बुध्दिबळ पटावर यशस्वी चाल

The Clear News Desk by The Clear News Desk
April 8, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय बुध्दिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले. प्रेसिडेंट कॉटेज, अजिंठा रोड या रिसॉर्ट येथे हा सोहळा पार पडला.

याप्रसंगी महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डाॕ. प्रविण मुंढे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदकुमार गादिया, आॕल इंडिया चेस असोसिएशनचे आॕरबिटर कमिटीचे चेअरमन धर्मेंद्र कुमार, रेटिंग ऑफिसर गोपाकुमार, महाराष्ट्र चेस असोसिएशचे सचिव निरंजन गोडबोले व्यासपिठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. तसेच बुध्दिबळ पटावर अभिजीत राऊत आणि डाॕ.प्रविण मुंढे यांनी पटावर चाल करून स्पर्धेची सुरूवात केली. प्रास्तविक करताना नंदलाल गादिया यांनी स्पर्धेबाबतची माहिती दिली. मंगेश गंभीरे यांनी सूत्रसंचालन केले. आभार जैन स्पोर्टस अकॅडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे यांनी केले. महाराष्ट्रातील राष्ट्रीय खेळाडू नागपूरची दिव्या देशमुख, औरंगाबादची तनिषा बोरामणीकर, साक्षी चितलांगे, जळगावची भाग्यश्री पाटील यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पारतोषिके देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पर्धेला शुभेच्छा देताना सांगितले की, कोणत्याही शहराची ओळख ही क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमांनी होते. या राष्ट्रीय स्तरावरील बुध्दीबळ स्पर्धेमुळे जळगावातील खेळाडूंना चांगले व्यासपिठ उपलब्ध झाले आहे. पोलीस अधिक्षक डाॕ. प्रविण मुंढे स्पर्धेच्या आयोजनाने जळगावची ओळख क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर होत असल्याने यासाठी सहकार्य करणारे अशोक जैन कौतुक केले. सचिव निरंजन गोडबोले राष्ट्रीय स्पर्धेसाठी अशोक जैन यांनी पाठबळ दिल्याने ती यशस्वी होत आहे.

READ ALSO

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

क्रीडा क्षेत्रासाठी अशोक जैन व अतुल जैन यांचे नेहमी सहकार्य लाभलेले असते त्यामुळेच मोठ्या स्वरूपातील कार्य पुर्ण होण्यास शक्य होते. जळगावातील या बुध्दिबळ स्पर्धेचे प्रायोजकत्व अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि.यांनी स्विकारले असुन ही स्पर्धा पुरुष व महिला गट अशी स्वतंत्रपणे होत आहे. महिला गटात एकूण ११ संघ तर पुरूष गटात २२ संघ सहभागी आहे. पुरुष गटामध्ये एल आय सी ऑफ इंडिया, ऑल इंडिया रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स, सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड आर एस पी बी टीम, तामिळनाडू संघ, आंध्र संघ, बिहार, केरळ, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, भारतीय विमानतळ प्राधिकरण आदी संघांनी सहभाग निश्चित केला आहे. तर महिला गटामध्ये आंध्र, गुजरात, ओडिसा, बिहार, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्य संघ तर पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाच संघ,भारतीय विमानतळ प्राधिकरण देखील स्पर्धेत सहभागी असेल. भारतातील अग्रगण्य मोबाईल प्रिमीयर लिग फाउंडेशन (एम पी एल) व स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (अर्थात साई) या संस्था अखिल भारतीय बुध्दीबळ महासंघाशी करारबध्द असून देशभरातील सर्व स्पर्धांसाठी त्यांचे बहुमोल सहकार्य मिळाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
Next Post

भारनियमनाचे संकट टाळण्यासाठी सीजीपीएलकडून वीज खरेदीचा उर्जा विभागाचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तुम्हीही पॉर्न चित्रपट पाहात असाल तर ‘या’ फसवणुकीचे होऊ शकता बळी !

January 27, 2022

ओझरखेडा धरणानजीक बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त !

February 16, 2024

तरुणाचा तोंडाला रुमाल बांधून लोखंडी पाईपाने केली बेदम मारहाण !

September 6, 2025

धरणगावातून मोटार सायकल चोरणाऱ्या टोळीला अमळनेर पोलिसांनी घेतले ताब्यात !

May 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group