जळगाव (प्रतिनिधी) येथील गुजराल पेट्रोल पंप जवळ शेतकऱ्यांसाठी मित्र असलेल्या महिंद्रा कंपनीच्या ट्रक्टरच्या शो रूमचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ग्राहकांसाठी साई संकल्प मोटर्सचे उदघाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी खा. उन्मेष पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. राजू मामा भोळे, माजी पालकमंत्री आ. गुलाबराव देवकर जि प अध्यक्ष रंजनाताई पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, डॉ. आश्विन सोनवणे, ज्येष्ट नगरसेवक आबा कापसे, प्रतीभा देशमुख, डॉ. चंद्रशेखर पाटील, किशोर बविस्कर, डॉ. प्रदीप तळवलकर, लोक संघर्ष मोर्चाचे प्रतिभा शिंदे, संगीतम ट्रॅव्हल्सचे संचालक सतिश देशमुख, विनोद पाटील, प्रोपा डॉ.. दिगंबर ऊग्ले, राजेंद्र बविस्कर, अँड. कुणाल पवार, संजय पाटील आदी उपस्थित होते.