मुंबई (वृत्तसंस्था) जालना येथे मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या पार्थ सैनिकी शाळेस वाढीव २० टक्के अनुदान मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
पार्थ सैनिकी शाळेची इयत्ता ६ वी ते १० ची प्रत्येकी एक तुकडी याप्रमाणे एकूण अतिरिक्त ५ तुकड्यांवरील १० शिक्षक पदांना २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून वाढीव २० टक्के अनुदान मंजूर करण्यात आले.