जळगाव (प्रतिनिधी) विवाहितेच्या नंबरवर अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठवल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १५ जुलै २०२२ रोजी ते दि. १६ जुलैच्या दरम्यान, अज्ञात व्यक्तीने ९८२२६०९५६३ या मोबाईल क्रमांकाच्या व्हॉटसअपद्वारे ऑनलाईन पिडीत विवाहितेच्या मोबाईलवर अश्लील फोटो, अश्लील व्हिडीओ, व्हॉईस मेसेज रेकॉडींग तसेच त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत असलेला एकत्र फोटो पाठवून पिडीतेची बदनामी व्हावी या उद्देशाने पाठवले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत.