जळगाव (प्रतिनिधी) अज्ञात व्यक्तीने एका तरुणाच्या भावी पत्नीला इन्स्टाग्रामवर (Instagram) शिवीगाळ करत अश्लील फोटो टाकल्या प्रकरणी एका तरुणाने सायबर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Jalgaon Crime News)
या संदर्भात अधिक असे की, चोपडा तालुक्यातील एका गावातील तरुणाच्या भावी पत्नीच्या इन्स्टाग्रामवर अज्ञात व्यक्तीने दि. २० ते २१ फेब्रुवारी रोजीच्या दरम्यान, पिडीत तरुणाच्या भावी पत्नीच्या इन्स्टाग्रामवर yuga_patil३३३३ नामक अनोळखी इन्स्टग्राम खातेधारकाने स्वतःची ओळख लपवून आम्हाला शिवीगाळ, अश्लील मॅसेज व अश्लिल फोटो पाठविल्याची तक्रार पिडीत तरुणाने जळगाव सायबर पोलिसात दिली आहे. या प्रकरणी yuga_patil३३३३ नामक अज्ञात खाते धारक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. लिलाधर कानडे हे करीत आहेत.