जळगाव (प्रतिनिधी) शहर मनपा मार्केट गाळेधारक संघटना यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे.
यावेळी गाळेधारकांनातर्फे डॉ. शांताराम पाटील नगरसेवक भगत बालाणी उपोषणाला बसलेले होते. त्याठिकाणी जाऊन आज जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील, महिला महानगर अध्यक्ष मंगलाताई पाटील यांनी संबंधित उपोषण करणाऱ्या व्यापाऱ्यांना भेट देऊन गाळेधारक संघटनेचा काय प्रॉब्लेम आहेत, त्यांना काय अडचणी आहेत, त्या सगळ्या समजून घेतल्या व राज्य सरकारकडे संबंधित गाळेधारकांचे समस्या मांडून त्यावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, प्रवक्ते योगेश देसले, सरचिटणीस अशोक पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, लीलाधर तायडे, आर्किटेक्ट सोनवणे, महानगर उपाध्यक्ष अनिरुद्ध जाधव, अनिल पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.