अमरावती (वृत्तसंस्था) कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे अमरावती उपविभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाबाहेर कृषी विभागाच्या सर्व संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन केले.
अमरावती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात दिनांक २० जानेवारी रोजी सुरेशा राजगुरे या व्यक्तीने माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. मात्र ते आपली माहिती मागण्याकरिता अवघ्या ८ दिवसात २९ जानेवारीला विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात पोहोचले. व मला माहिती दोन मिनिटात पाहिजे असे सांगितल्यानंतर कार्यालयातील अधिकार्यांनी तुम्हाला ३० दिवसाच्या आत माहिती उपलब्ध होऊन जाईल असे सांगितले असता गाजगुरे यांनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे आज अमरावती उपविभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाबाहेर कृषी विभागाच्या सर्व संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर कारवाई होत नाही, शासनस्तरावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. राजगुरे यानी अनेक महितीचे अधिकाराचे पत्र देखील या कार्यालयात सादर केले. त्यानीं बऱ्याच अधिकाऱ्यांना खंडणीची मागणी केल्याचे आरोप कर्मचाऱ्यांनी केले आहेत.