मुंबई : राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सरकार स्थापन झाल्यावर 3 महिन्यात निवडणुका घेण्याबाबत महायुतीने निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
येत्या 3 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुतीत याबाबत एकमत झाले आहे. विधानसभा निवडणूक निकालाचा माहोल, असे पर्यंत निवडणुका घेण्यावर महायुतीमध्ये एकमत झाले आहे. सरकार स्थापन होताच पहिल्या कॅबिनेट बैठकीत महापालिका निवडणूकांची अधिसूचना जारी केली जाणार आहे. त्यामुळे राज्यात ३ महिन्यांत पुन्हा एकदा निवडणूक प्रचाराचा धुरळा उडणार आहे. महापालिका निवडणुकांसोबत जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.