TheClearNews.Com
Monday, July 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

जळगावच्या केळी उत्पादकांसाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

vijay waghmare by vijay waghmare
June 11, 2026
in कृषी, धरणगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी, ता. धरणगाव (प्रतिनिधी) – मे व जून महिन्यादरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली.

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा झालेल्या या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील आणि रावेरचे आ. अमोल जावळे यांनी शेतकऱ्यांच्या विविध – समस्या आणि मागण्या ठामपणे मांडल्यात. बैठकीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वादळी वाऱ्यामुळे बाधित झालेल्या फळपिकांचे पंचनामे तातडीने आणि काटेकोरपणे पूर्ण करण्याचे निर्देश देत शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगितले. नुकसान भरपाईची प्रक्रिया गतीमान करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी महसूल, कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात २३ मे ते ६ जून २०२६ या कालावधीत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ४१३ गावांतील १० हजार ३६९ शेतकऱ्यांचे सुमारे ७ हजार २१६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती बैठकीत सादर करण्यात आली. यामध्ये रावेर तालुक्यातील सुमारे ३ हजार ७७१ हेक्टर, मुक्ताईनगर तालुक्यातील १ हजार ५४९ हेक्टर तर चोपडा तालुक्यातील ८८५ हेक्टर क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादकांना सर्वाधिक फटका बसल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

READ ALSO

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

चाळीसगावच्या विकासाला नवे पंख; तब्बल ₹९० कोटींच्या प्रशासकीय प्रकल्पांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

मध्य प्रदेशप्रमाणे शेतकऱ्यांना २ लाखांची मदत द्या

या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने महत्त्वपूर्ण मुद्दे मांडताना विमा कंपनीकडून कमी क्षेत्र दाखवण्याच्या तक्रारी, पूर्वसूचना नोंदणीतील तांत्रिक अडचणी, एमआरएसएसी अहवालामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव तसेच केळी उत्पादकांना विशेष आर्थिक मदत देण्याची मागणी केली. मध्य प्रदेश शासनाप्रमाणे नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २ लाख रुपये विशेष मदत देण्याची मागणीही त्यांनी केली. यावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सकारात्मक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या मागणीबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच विमा कंपनीने प्रत्यक्ष पंचनामे आणि वस्तुस्थितीच्या आधारे दावे निकाली काढावेत, अपील केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करावी आणि नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण पुढील दहा दिवसांत पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करा

बैठकीच्या शेवटी कृषिमंत्री भरणे यांनी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून सर्व यंत्रणांनी काम करावे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत न्याय व मदत मिळाली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश देत सर्व संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील व दोन्ही आमदारांच्या पुढाकारामुळे जिल्ह्याच्या प्रश्नांना राज्य शासनाच्या सर्वोच्च स्तरावर प्राधान्य मिळाल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

यांची होती उपस्थिती

बैठकीत फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व्हिडीओ
कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. तसेच कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव परिमल सिंग, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक विनयकुमार आवटे, कृषी संचालक (विस्तार) रफिक नाईकवाडी, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, भारतीय कृषी विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Agriculture Minister directs immediate assistance for banana growers in the districtDhrngoan

Related Posts

धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
चाळीसगाव

चाळीसगावच्या विकासाला नवे पंख; तब्बल ₹९० कोटींच्या प्रशासकीय प्रकल्पांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

July 26, 2026
जळगाव

देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाचा ‘कृषी माऊली सोहळा’ उत्साहात

July 26, 2026
विशेष लेख

सलग दुसऱ्या वर्षी वारकऱ्यांच्या सेवेत… पंढरपुरात मंत्री गिरीश महाजन यांचे तब्बल १२ ते १४ तास गर्दी नियोजन; भाविकांच्या सुरक्षिततेला दिले सर्वोच्च प्राधान्य

July 25, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
जळगाव

DLP अंतर्गत कंत्राटदारांकडूनच रस्त्यांची दुरुस्ती करा – नगरसेविका वैशाली पाटील यांचे आयुक्तांना निवेदन

July 24, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 12 जून 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी !

May 18, 2024

धरणगावातील वाढीव पाणीपुरवठा योजनेचा पहिला टप्पा आजपासून होणार सुरू !

June 6, 2023

ठाकरे सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम करतंय : आशिष शेलार

August 4, 2021

मानमोडी ग्रामपंचायत जलजीवन मिशन घोटाळा ; माजी सरपंच आणि सचिव विरोधात गुन्हा दाखल

January 31, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group