TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सलग दुसऱ्या वर्षी वारकऱ्यांच्या सेवेत… पंढरपुरात मंत्री गिरीश महाजन यांचे तब्बल १२ ते १४ तास गर्दी नियोजन; भाविकांच्या सुरक्षिततेला दिले सर्वोच्च प्राधान्य

vijay waghmare by vijay waghmare
July 25, 2026
in विशेष लेख, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर (प्रतिनिधी) – आषाढी एकादशीच्या पवित्र सोहळ्यासाठी यंदा पंढरपुरात भाविकांची विक्रमी गर्दी झाली. सुमारे ३५ ते ४० लाख वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. एवढ्या प्रचंड गर्दीत प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित दर्शन मिळावे, कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि व्यवस्थापन सुरळीत राहावे यासाठी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा स्वतः मैदानात उतरून नेतृत्व केले.

गेल्या दोन दिवसांपासून पंढरपुरात तळ ठोकून असलेल्या मंत्री महाजन यांनी सुरुवातीपासूनच गर्दी नियोजनाची सूत्रे हातात घेतली. शहरातील विविध भागांची मोटारसायकलवरून पाहणी करत त्यांनी पोलिस व प्रशासनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन संभाव्य परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.

READ ALSO

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय पूजेनंतर मध्यरात्रीपासून ते दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत सलग १२ ते १४ तास मंत्री गिरीश महाजन हे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून गर्दी नियंत्रणासाठी कार्यरत होते. महाद्वार परिसरासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी, जिथे अनेक रस्ते एकत्र येतात, तेथे उभारण्यात आलेल्या नियंत्रण मनोऱ्यातून त्यांनी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवले. वारकऱ्यांना शुभेच्छा देतानाच पोलिसांचे मनोबलही त्यांनी वाढवले.

एखाद्या मंत्र्याने केवळ आदेश देण्याऐवजी प्रत्यक्ष मैदानात उतरून पोलिसांसोबत तासन्तास उभे राहून काम करणे, ही बाब उपस्थित वारकरी आणि नागरिकांसाठी समाधानाची ठरली. प्रत्येक भाविक सुरक्षितपणे दर्शन घेऊन परतावा, हीच भावना त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून आली.

विशेष म्हणजे, ही पहिलीच वेळ नव्हे. सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारीत मंत्री गिरीश महाजन यांनी अशीच जबाबदारी स्वीकारत प्रत्यक्ष गर्दी व्यवस्थापनात सहभाग घेतला आहे. संकटाच्या काळात घटनास्थळी उपस्थित राहून प्रशासनाला दिशा देणारे नेतृत्व म्हणून त्यांनी पुन्हा एकदा आपली ओळख अधोरेखित केली.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, प्रत्येक लहान-मोठ्या घडामोडीवर सतत लक्ष ठेवत त्यांनी जबाबदारी पार पाडली. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांसोबत केलेली त्यांची ही अथक सेवा आणि समर्पण निश्चितच कौतुकास्पद ठरले असून, “जनतेसाठी सदैव मैदानात असलेला नेता” ही त्यांची प्रतिमा यामुळे अधिक दृढ झाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonprioritizing the safety of devotees above all else.Serving Warkaris for the second consecutive year... Minister Girish Mahajan personally managed the crowds in Pandharpur for a staggering 12 to 14 hours

Related Posts

जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 सप्टेंबर 2026 !

September 7, 2026
जळगाव

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

September 6, 2026
Next Post

बोलवा विठ्ठल' मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इंदिरानगर परिसरातून मोटारसायकल चोरी ; पाळधी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

June 17, 2022

भोसरी जमीन प्रकरण : सातबारा उताऱ्यानुसार ‘ती’ जमीन ‘एमआयडीसी’च्या मालकीची नाही ; विशेष न्यायालयाचे निरीक्षण !

October 16, 2021

योग्य नियोजना अभावी धरणगावात पाणी टंचाई; दीपक वाघमारे यांचा आरोप ! (व्हीडीओ)

December 22, 2020

काशिनाथ पलोड स्कुलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा !

September 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group