TheClearNews.Com
Sunday, September 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांची ग्वाही

vijay waghmare by vijay waghmare
September 6, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील उद्योजकांचे वीजप्रश्न तत्परतेने सोडवण्यात येतील. त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारण्यात येतील, अशी ग्वाही महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी दिली.
महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात रविवारी (6 सप्टेंबर)​आयोजित बैठकीत औंढेकर यांनी उद्योजकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी, अधीक्षक अभियंता संजय सरग, प्रभारी अधीक्षक अभियंता चेतन नंदनवार यांची प्रमुख उपस्थिती होती. जळगाव जिल्ह्यातील उद्योजक प्रत्यक्ष तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील उद्योजक व्हीसीद्वारे बैठकीस‍ उपस्थित होते.
यावेळी महावितरण आणि उद्योजकांमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, नरडाणा, नवापूर, भुसावळ, जामनेर, चाळीसगाव या औद्योगिक क्षेत्रातील वीज पायाभूत सुविधा, दर्जेदार वीजपुरवठा, फीडर व उपकेंद्रांची क्षमता, व्होल्टेजची गुणवत्ता, नवीन उद्योगांना वीज जोडणी आणि भविष्यातील वाढत्या मागणीवर सविस्तर चर्चा झाली. या सर्व औद्योगिक वसाहतींना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा व सेवा देण्याच्या दृष्टीने 33 केव्हीच्या नवीन उपकेंद्रासाठी औद्योगिक ग्राहकांनी जागा उपलब्ध करून दिल्यास तत्परतेने उपकेंद्र उभारण्याच्या हालचालींना वेग देऊ, असे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी सूचित केले. औद्योगिक ग्राहकांच्या वीज सेवेत हयगय खपवून घेतली जाणार नाही असे स्पष्ट निर्देश देताना संचालक औंढेकर यांनी वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे कारण शोधून त्यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे तसेच गरज असेल त्या ठिकाणी वाहिनी विलगीकरणाची कामे करण्याचे निर्देश दिले. जळगाव एमआयडीसीत काही उपकेंद्रांची क्षमतावाढ करण्यात आलेली आहे. प्रस्तावित दोन उपकेंद्रांच्या जागा प्राप्त असून, दोन उपकेंद्रांच्या जागांसाठी एमआयडीसीकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरात लवकर ही उपकेंद्रे उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांनी दिले. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातही आवश्यक तेथे उपकेंद्र, क्षमतावाढ व वाहिनी विलगीकरणाची कामे करून उद्योगांना अविरत वीज देण्याचे आश्वासन औंढेकर यांनी दिले.
जळगाव परिमंडलातील उद्योजकांनी स्मार्ट मीटर बसवण्यास पसंती दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच स्मार्ट मीटर बसवल्यानंतर येणाऱ्या बिलांच्या अडचणीबाबत एनसीसी एजन्सीने दर आठवड्याला मेळावे घेऊन ग्राहकांच्या तक्रारी सोडवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. संचालक पदावरील अधिकाऱ्याने जळगावात येऊन उद्योगांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडवण्याची ग्वाही दिल्याबद्दल उद्योजकांनी बैठकीत समाधान व्यक्त केले.

 

READ ALSO

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonElectricity-related issues faced by entrepreneurs will be resolved promptly.

Related Posts

कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अंगणात झोपलेल्या वृद्धाच्या अंगावर ॲसिड टाकून निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल जबर धक्का !

September 20, 2023

“ताई टेस्ट निगेटीव्ह असली, तरी काळजी घ्या” म्हणत धनंजय मुंडेंचा बहीण प्रीतम मुंडेंना काळजीयुक्त संदेश

April 25, 2021

अहिराणी संगीत क्षेत्रात तरुणाईने आणला ‘लोकल टू ग्लोबल’चा नवा पॅटर्न !

April 26, 2021

BMC विरोधात सोनू सूदची हायकोर्टात धाव; अनधिकृत बांधकाम न केल्याचा दावा

January 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group