TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच श्रेष्ठ : फाली अधिवेशनात

विद्यार्थ्यांनी घेतले यशस्वी शेतीचे धडे

vijay waghmare by vijay waghmare
June 4, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – शेतीसमोरील आव्हाने, बदलते हवामान, उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील चढ-उतार शेतीसमोर या अनेक अडचणी आहेत. मात्र, या अडचणींना न घाबरता नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब, योग्य नियोजन आणि नावीन्यपूर्ण प्रयोग यांच्या बळावर शेती अधिक फायदेशीर आणि शाश्वत पद्धतीने करता येते. मग एखाद्या उद्योग-नोकरीपेक्षाही शेती श्रेष्ठ ठरते, असे प्रगतशील शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. जैन हिल्स येथे सुरू असलेल्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (फाली)च्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी ४ जून रोजी शेतकरी-विद्यार्थी यांच्यात संवाद झाला.

शेतकऱ्यांनी त्यांच्या अनुभवकथनातून विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील संधी, नवकल्पना आणि उद्योग याबाबत माहिती दिली. संध्याकाळी झालेल्या सत्रात प्रगतिशील शेतकऱ्यांच्या चर्चेत स्वप्नाताई राजू चौधरी, अभिजीत विकास शेळके, पद्माकर जगन्नाथ पाटील, यश चंद्रकांत चौधरी, राजू चौधरी हे शेतकरी सहभागी झाले होते. या शेतकऱ्यांना फालीच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून शेतीबद्दल अधिक माहिती घेतली.

READ ALSO

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

शिरपूर येथील स्वप्नाताई चौधरी यांनी सांगितले की, नवतंत्रज्ञान आणि परिश्रम एकत्र आले तर शेती ही परवडणारी ठरते. नोकरी करणाऱ्या पतीपेक्षा मी शेतकरी पतीच निवडला. जामनेर तालुक्यातील भागदरा येथील युवा शेतकरी अभिजीत विकास शेळके यांनी नोकरीपेक्षा परिवारात राहून शेती करणे यास अधिक प्राधान्य दिले. यासंदर्भामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने सुसंवाद साधला. तरडी येथील प्रयोगशील शेतकरी पद्माकर जगन्नाथ पाटील यांनी आपल्या शेतात पपई, केळी आणि अन्य फलोत्पादनाचे प्रयोग यशस्वी केल्याचे सांगितले. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील यश चंद्रकांत चौधरी यांनी कृषी पदवी शिक्षणानंतर शेतीच करण्याचे ठरवले. आधुनिक पद्धतीने जैन इरिगेशनच्या उच्च तंत्रज्ञानाचा अवलंबन करून डाळिंबामध्ये भरघोस उत्पादन घेतल्याचे त्यांनी सांगितले. डाळिंबासमवेतच जैनची टिश्यू कल्चर केळी, सोयाबीन यांची देखील लागवड त्यांनी आपल्या शेतामध्ये केली आहे. यावेळी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी देखील विद्यार्थ्यांची सुसंवाद साधत आपल्या ज्ञान आणि अनुभवाचे दालन खुले केले.

तत्पूर्वी सकाळ सत्रात विद्यार्थी व अॅग्री कल्चर एज्युकेटर यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. त्यात परिश्रम हॉल, जैन हिल्स कृषी संशोधन केंद्र, ठिबक सिंचन डेमो, अल्ट्रा हाय डेंसिटी प्लांटेशन, फ्यूचर फार्मिंग, एअर आलू व टिश्यू कल्चर प्रकल्प पाहिले. हायटेक प्लॉट फॅक्टरीत टिश्यू कल्चर रोपांची निर्मिती प्रक्रिया पाहून विद्यार्थी थक्क झाले. या उपक्रमाला जैन इरिगेशन, गोदरेज ॲग्रोव्हेट, यूपीएल, आयटीसी, स्टारअ‍ॅग्री, प्रॉम्प्ट डेअरीटेक, एसबीआय फाउंडेशन आदी अग्रगण्य कंपन्यांचे सहकार्य लाभले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAgriculture is better than industry and jobs: Fali in the convention

Related Posts

गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुन 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचे राशी भविष्य 30 मे 2024 !

May 30, 2024

अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आदर्शवत आणि प्रेरणादायी – डॉ नरसिंह परदेशी

March 19, 2025

एनसीबी चौकशी आधी ढसाढसा रडली अनन्या पांडे ; आर्यन खानच्या प्रश्नाबाबत दिली ही उत्तरं !

October 23, 2021

नावातील साम्य साधत महिलेने भुसंपदनाची १७ लाख लाटले

November 21, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group