भुसावळ (प्रतिनिधी) स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर आधारित स्वतंत्र भारतीय संविधानाला आज मान्यता प्राप्त झाली म्हणून समाजामध्ये या त्रिसूत्रीची अंमलबजावणी होण्यासाठी आजचा दिवस हा ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो, असे मत शहीद भगतसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे भुसावळ शहर अध्यक्ष निलेश रायपुरे यांनी मांडले.
भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटर ला आज संविधान दिनानिमित्त त्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली आणि पुढे म्हणाले की आज संविधान दिनानिमित्त प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधानाने आखून दिलेली चौकट आणि नियम याचे काटेकोर पणे पालन करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण करेल याची शपथ घ्यावी, याच सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या शुभेच्छा.सर्व वैद्यकीय वर्गाने आज सामूहिक संविधान पालन शपथ घेतली.
यावेळी प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मयूर नितीन चौधरी, डॉक्टर प्राजक्ता नेवे,दीपक ढगे,युवराज महाजन, महेंद्र सोनवणे,मनोज सावकारे,रजनी बडगुजर, माहेश तायडे,दिगंबर पाटील,विकी मेश्राम,शशिकांत अहिरे,विद्या तायडे,सपना इंगळे,रेखा पाटील, अश्विनी बागुल,ज्योती साबळे,श्रीरीन तडवी,आजिम शेख आदी संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता.