मुंबई (वृत्तसंस्था) भारतात शेअर बाजारानं पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. मुंबई शेअर बाजारानं नवा उच्चांक गाठला आहे. पहिल्यांदाच मुंबई शेअर बाजारानं ६० हजारांचा आकडा गाठला आहे. सकाळी बाजार उघडताच सेंसेक्स २७३ अंकानी उसळी घेत ६० हजारांपार पोहोचला.
गेल्या काही आठवड्यापासून शेअर बाजारात जबरदस्त तेजी दिसून आली आहे. मार्केटमधील तेजीची घौडदौड अद्यापही कायम असून आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने विक्रमी अंकांची नोद केली आहे. जागतिक गुंतवणूकदारांच्या वाढत्या गुंतवणुकीचा परिणाम, अमेरिकी फेडचा बॉंड संदर्भातील निर्णय, कोरोनाचा कमी झालेला संसर्ग, आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूती इत्यादी फॅक्टर बाजाराच्या तेजीला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
शेअर बाजाराच्या विक्रमी घोडदौडीत गुरूवारी BSE सेन्सेक्स ६० हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला होता. गेल्या काही दिवसात शेअर बाजाराची चाल बघता आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ही पातळी ओलांडण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. आज मार्केट सुरू होता ६० हजाराचा आकडा पार झाला आणि गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.
BSE सोबतच NSEच्या निफ्टीनेही १७,९०० अंकाची कॅप ब्रेक केली आहे. मार्केट सुरू होताच निफ्टीने १८,२०० अंकांची ऐतिहासिक उसळी घेतली होती. सेन्सेक्सनं ५० हजाराचा टप्पा २२ जानेवारीला ओलांडाला होता तर अवघ्या २७२ दिवसात १० हजार अंकांची उसळी नोंदवली गेली आहे.