नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीयांना पुन्हा एकदा जागरुकता बाळगावी लागेल असं केलं नाही तर करोना संकट पुन्हा येऊ शकतं तेव्हा ढिलाई करु नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
सगळ्या जगाला वाटलं होतं की कोरोनावर भारत मात करु शकणार नाही. कोरोना संकटाच्या खोल समुद्रातून बाहेर पडून आपण किनाऱ्याकडे वाटचाल करतो आहोत. असं असलं तरीही आपल्याला कोणतीही ढिलाई करुन भागणार नाही. भारतात कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट जेव्हा वाढला तेव्हा अनेक लोकांना वाटू लागलं की हा व्हायरस कमजोर झाला आहे. अनेक लोकांना हे वाटू लागलं की समजा आपल्याला कोरोना झाला तरीही आपण बरे होऊ. यामुळे निष्काळजीपणाची व्याप्ती वाढली. त्यामुळे आपल्या देशात जे सण उत्सव सुरु होणार होते त्याच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की कुणीही निष्काळजीपण करु नका कारण कोरोनावर कोणतीही लस अद्याप आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं हे वक्तव्य भाजपाने ट्विट केलं आहे आणि लोकांनी कोरोनाच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा करु नये असं म्हटलं आहे.