जामनेर (प्रतिनिधी) जामनेर शहरात भारतातील सर्वात मोठ्या ‘नमो’ कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ११ रोजी होणाऱ्या या दंगलीच्या पटांगणाचे रविवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
या कुस्त्यांच्या दंगलीसाठी पंजाब, हरियाणा, जम्मू, कश्मीर, दिल्ली येथून मल्ल येणार आहेत. यात हिंदकेसरी, अर्जुन पुरस्कारप्राप्त मल्लांचाही समावेश असनार आहे. १९ रोजी दुपारी एक वाजेपासून ही कुस्त्यांची स्पर्धा होणार आहे. तरुणांनी व्यसनमुक्त रहावे या हेतूने आयोजन करण्यात आल्याची माहीती मंत्री महाजन यांनी भूमिपूजनाप्रसंगी दिली. यावेळी माजी खासदार उल्हास पाटील, जे. के. चव्हाण व भाजपचे प्रमुख पदाधिकारी हजर होते.