TheClearNews.Com
Thursday, June 26, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘अनुभूती बालनिकेतन’द्वारे संस्कारशील समाज घडविण्याची प्रेरणा – सेवादास दलिचंद ओसवाल !

मॉन्टेसरी पद्धतीच्या अनुभूती बालनिकेतनचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन !

vijay waghmare by vijay waghmare
August 4, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘जगात जे जे चांगले आहे त्याचे आपल्या गावाला, समाजाला फायदा होऊन पुढची पिढी घडावी या उद्देशाने भवरलाल जैन यांनी अनुभूती निवासी स्कूलची स्थापना केली. त्याच विचारातून संस्कारशील समाज निर्मितीची प्रेरणा देणारी अनुभूती बालनिकेतन ही मॉन्टेसरी पद्धतीने सुरू केली. हा आनंद म्हणजे भवरलाल जैन यांच्या स्वप्नपूर्तीचा आहे’असे मनोगत सेवादास दलिचंद ओसवाल यांनी व्यक्त केले.

मॉन्टेसरी स्कूल ‘अनुभूती बालनिकेतन’ सुरू करण्यात आली. त्याच्या कोनशिला अनावरण व उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मदनलाल देसर्डा, रोहित बोहरा, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, राजेंद्र मयूर, रमेशदादा जैन उपस्थित होते. यांच्यासह जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, अनुभूती बालनिकेतनच्या प्रमुख गायत्री बजाज, डॉ. विश्वेश अग्रवाल, प्रा. अनिल राव, भरत अमळकर, प्रदीप रायसोनी, डॉ. शेखर रायसोनी, डॉ. वर्षा पाटील, मधुभाभी जैन, डॉ. राहुल महाजन, अनिष शहा, यांच्यासह जैन परिवारातील सदस्य उपस्थित होते.

READ ALSO

जळगाव बसस्थानकात खिसे कापणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश ; 5.51 लाखांचा मुद्देमाल जप्त

महाबळ रस्त्यावरील अतिक्रमण हटवले !

सौ. अंबिका जैन यांनी प्रास्ताविकातून अनुभूती बालनिकेतन सुरु करण्याबाबतचा उद्देश सांगितला. महात्मा गांधीजींच्या विचारांच्या धर्तीवर भावनिकदृष्ट्या समाजाची निर्मिती व्हावी आणि एक दुसऱ्यांकडून शिकण्याची वृत्ती निर्माण व्हावी याच विचारधारेतून अनुभूती बालनिकेतनची सुरवात केल्याचे सौ. अंबिका जैन यांनी सांगितले.

भवरलालजी जैन यांच्या ‘सार्थक करुया जन्माचे, रुप पालटू वसुंधरेचे’ या विचारांचे प्रतिक म्हणजे अनुभूती बालनिकेतन असल्याचे रोहित बोहरा यांनी म्हटले. गायत्री बजाज यांनी मॉन्टेसरी तत्वज्ञान काय आहे हे सांगितले. भारतीय गुरूकूल पद्धतीला पुन्हा मजबूत करण्यासाठी वेगळे काही करता येईल का हा विचार करत होते त्याचे स्वप्न अशोक जैन यांच्यासह जैन परिवाराच्या प्रयत्नातून पुर्ण झाल्याचे सांगितले.

कार्यक्रमाची सुरवात हरिहंतो भगवतो.. या मंत्राने दलिचंद ओसवाल यांनी केली. अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इतनी शक्ती हमें दे ना दाता.. हम होंगे कामयाब हे गीत म्हटले. राष्ट्रगीताने समारोप झाला.

अनुभूती बालनिकेतनचे वैशिष्ट्ये !

‘अनुभूती बालनिकेतन’ मध्ये ३ ते ६ मिश्र वयोगटातील विद्यार्थी खेळता-खेळता आपल्या निरीक्षणातून क्रियाशीलतून, स्वयंशिस्तेतून संस्कारीत होतील. शिक्षणाविषयी आवड निर्माण होऊन आनंदाने ते बदल स्वीकारतील अशी शिक्षणपद्धती आहे. आजूबाजूच्या पर्यावरणासह आपल्यापेक्षा मोठ्यांकडून परस्परभावनेतून, व्यवहार ज्ञानासह आचरण करण्याची शिकवण घेता येईल. स्वयंनिरीक्षणातून, प्रात्यक्षिक शिक्षणातून पुस्तकांविना मुलांच्या बुद्धिकौशल्याचा विकास करण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या असलेल्या यथोचित वस्तू वेगवेगळ्या देशांतून ‘अनुभूती बालनिकेतन’ येथे उपलब्ध करुन दिल्या आहेत. खेळता-खेळता टेबल लर्न करणे, वाचता-वाचता Vocabulary (शब्दसंग्रह) वाढविणे, शब्दांची आणि वाक्यांची रचना करणे, जगाच्या नकाशातून भुगोल शिकणे, पेन-पेन्सील व कागदाचा अचूक वापर करून अक्षरांची ओळख करणे, गणितांचे कोडे सोडणे, जड फर्निचरच्या जागी, मुलांना सहजपणे हलवता येतील अशा लहान मुलांच्या आकाराच्या टेबल आणि खुर्च्या, लहान मुलांचा सहजपणे हात पोहोचू शकेल अशी लहान आकाराची कपाटे अश्या अनेक गोष्टी येथे आहेत. फुलांची रचना करणे, हात धुणे, जिम्नॅस्टिक्स, स्वयंपाक करताना भाजीपाला निवडणे, धान्य निवडणे, बटन लावणे यासारख्या प्रत्यक्ष कृतींचा समावेश अनुभूती बालनिकेतनमधील शिक्षणामध्ये केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव बसस्थानकात खिसे कापणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश ; 5.51 लाखांचा मुद्देमाल जप्त

June 26, 2025
जळगाव

महाबळ रस्त्यावरील अतिक्रमण हटवले !

June 26, 2025
गुन्हे

बापरे ! सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला गंडवले !

June 26, 2025
जळगाव

मुख्य अभियंत्याची धुळ्यातील औद्योगिक ग्राहक व महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न!

June 25, 2025
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार…

June 25, 2025
क्रीडा

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी

June 25, 2025
Next Post

जळगाव : तरूणावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या एकाला अटक; एमआयडीसीत गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आईसोबत शाळेतून घरी परतताना काळाची झडप ; डम्परच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू !

August 3, 2023

‘मंत्रालयात न जाण्याचा रेकॉर्ड, इस दुनिया का आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं’ : सुधीर मुनगंटीवार

October 25, 2021

धरणगाव मोठा माळीवाडा परिसरातील महिला आक्रमक ; ‘ते’ सार्वजनिक स्वच्छतागृह केले सुरु !

August 2, 2022

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी सक्ती प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांकडून शिंदे गटाच्या नगरसेवकाचा रेशन परवाना रद्द !

June 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group