मुंबई (वृत्तसंस्था) मे महिन्यात आदित्य ठाकरेंना आयोध्येला घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. याशिवाय, राज्यात दंगली भडकवण्याचे कट असल्याची गुप्तचर विभागाची माहिती असल्याचा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला. सत्ता येत नाही म्हणून दंगलींचा घाट घालण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला.
राम आणि हनुमान ही कायम आमची श्रद्धास्थानं राहिली आहेत. त्यामुळे काही लोकांनी राजकीय हनुमान जयंती साजरी करण्याचा चंग बांधला असेल तर तो त्यांना लखलाभ असो. आमच्याकडे रामाचा धनुष्यही आहे आणि हनुमानाची गदाही आहे. राम आणि हनुमानाचं कितीही राजकारण केलंत तरी ही दोन्ही दैवतं आमच्या पाठिशीची आहेत, असे संजय राऊत म्हणाले. भाजप निराशा वैफल्य ग्रस्त झाले आहे. सत्ता येत नाही, आमदार फुटत नाही. म्हणून काही लोकांना सुपाऱ्या दिल्या जात आहेत. राज्यात दंगली घडवायचा आणि राष्ट्पटी राजवट लागू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी म्हटलं.
जनतेने भाजपला ठेंगा दाखवला
नाशिक ही प्रभू रामाची भूमी आहे. पण, काही लोक हनुमान चालिसा वाचायला पुण्यात गेले. काहींनी भाढ्याने हिंदुत्व घेतले. हिंदुत्व कोणाला शिकवताय. भाड्यानं हिंदुत्व घेणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. आज कोल्हापूरचा निकाल लागला. या निवडणुकीला सुरुवात झाली, त्याच वेळी काही लोकांनी भोंगे हनिमान चालिसाचं घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. भोंग्यांचे राजकारण सुरु केले. पण, त्यांचा भोंगा वाजलाच नाही. जनतेने भाजपला ठेंगा दाखवला. एमआयएमकडून भाजप जे राजकारण करू इच्छित आहे. त्याचा दाखला कोल्हापूरच्या निवडणुकीत मिळाला. शिवसेना प्रमुखांची कॉपी करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न काहींनी केला. पण लोकं असं स्वीकारत नाहीत. या भोंग्यांच्या मागील आवाज कोणाचा आहे, हे जनतेला कळलं आहे. आज हनुमान जयंतीलाच भोंग्यांचं राजकारण संपलं आहे, अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली.