जळगाव (प्रतिनिधी) गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी अभियांत्रिकी महाविदयालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विदयापिठ, लोणेरे व इंटरनॅशनल जरनल ऑफ इनोव्हेशन्स इन इंजिनिअरिंग अॅण्ड सायन्स (IJIES) यांच्या संयुक्त विदयामाने दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये एकुण ८० संशोधकांचे संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांचे हस्ते करण्यात आले, त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सर्व संशोधकांचे अभिनंदन करुन त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. तसेच कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेबद्दल इंतभुत माहिती देतांना परिषदेमध्ये सादर होणाऱ्या संशोधन तसेच संशोधनासाठी उपस्थित असलेल्या तज्ञ मार्गदर्शक यांच्याबददल माहिती दिली. तसेच संशोधन व नाविन्यता यांच्या मुलभूततेतुन सदयस्थितीतील सर्व प्रकारच्या शाखांच्या प्रणालीचा विकास, याकरीता असणारा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सहभाग यावर मार्गदर्शन केले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विदयापिठाचे प्रा. डॉ. एस. बी. देवसरकार यांचे बिजभाषण झाले. त्यांच्या बिजभाषणाचा विषय ग्लोबल पस्पैक्टीव्ह टोबर्डस स्कीलींग अँड. फ़युचरिस्टीक बर्क फोर्स डेव्हलपमेंट हा होता. यामध्ये त्यांनी सस्टेनेबल फ़युचर इकॉनॉमी या विषयावर भाष्य करतांना केअर इकॉनॉमी व ब्ल्यु इकॉनॉमीबददल माहिती दिली. त्याचप्रमाणे विकसित देशांमध्ये प्रत्येक १०००० कर्मचाऱ्यांसाठी १०६ रोबोटस असे गुणोत्तर आहे पण आपल्या देशामध्ये हे गुणोत्तर १०००० कर्मचाऱ्यांसाठी फक्त ४ ते ५ आहे. तसेच आपल्या देशातुन विदयार्थ्यांच्या स्थलांतराचे प्रमाण हे ८ ते १० लाख उच्चशिक्षणासाठी आहे व त्यांचा आपल्या महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये १५% वाटा आहे.
त्याचप्रमाणे त्यांनी इतर गोष्टींवर प्रकाश टाकतांना सांगीतले की, सदयपरिस्थितीत युरोपिय देशांत आर्टीफिशियल इन्टेलिजन्स, मशिन लर्निंग आणि डाटा सायन्स या क्षेत्रात ४०००० डॉलर प्रती वर्षी व्यवसाय केला जातो. तसेच भारतामध्ये २००० डॉलर प्रति वर्षी व्यवसाय होतो. तसेच त्यांनी ग्रीन इकॉनॉमीचे महत्व सांगतांना वातावरण, कार्बन, ग्लोबल वार्मिंग यांचा शेतीच्या विकासावर होणारा परिणाम स्पष्ट केला.
त्याचप्रमाणे भारताच्या इकॉनॉमीवर बोलातांना त्यांनी सांगीतले की, एकुण २.६ ट्रीलियन डॉलर इकॉनॉमीपैकी फक्त ०.६% संशोधन व ४% शाळांवर खर्च होतो. हा विरोधाभास व त्यामध्ये असलेली उणीव त्यांनी निदर्शनास आणली.
तसेच देशातील असलेल्या शैक्षणिक धोरणांबददल बोलतांना त्यांनी सांगीतले की अभियांत्रिकी शिक्षण देण्यासाठी उदयोजकांनी स्वयंस्फुर्तीने पुढे येणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे अद्ययावत शिक्षणासाठी डिजीटल होणे गरजेचे आहे. कारण क्लासरूम प्रणाली ही कालबाहय होत आहे. त्याचप्रमाणे आपला भर नेहेमी उदयोगांच्या संलग्नतेवर असला पाहीजे. तसेच बौध्दीक गुणवत्ता वाढीसाठी रि-डिझाईन शिकावे लागेल. त्याप्रमाणे लर्निंग ग्रुपशी संवाद वाढला पाहीजे. तसेच डिजीटल स्कीलिंगच्या मार्फत गेमीफीकेशन वाढले पाहीजे.
त्याचप्रमाणे PPP मॉडेलचे महत्व सांगतांना, सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सहयोग बराच प्रभावी ठरतो. तसेच शैक्षणिक वाटचालीमध्ये उदारीकरण, स्वतंत्रता, जागतिकीकरण यांची गरज आहे असे त्यांनी नमुद केले.
या परिषदेमध्ये तज्ञ मार्गदर्शक (Session Chair) म्हणुन कॉम्प्युटर विषयासाठी प्रा. डॉ. मनोज ई. पाटील, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशनसाठी प्रा. डॉ. अनिल जे. पाटील, मेकॅनिकलसाठी प्रा. डॉ. ए. डी. विखार, इलेक्ट्रीकलसाठी प्रा. डॉ. किशोर भदाणे, हयुमॅनिटीज व बेसिक सायन्सेससाठी प्रा. डॉ. आर. बी. वाघुळदे यांचे अनमोल सहकार्य लाभले.
सदर परिषदेसाठी कॉम्प्युटर विभागात २० संशोधन पेपर, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागात १०, मेकॅनिकल विभागात २५, इलेक्ट्रीकल विभागात १५ व बेसिक सायन्सेस विभागात १० संशोधन पेपर असे एकुण ८० पेपर सादर केले गेलेत यापैकी शाखानिहाय प्रत्येकी २ उत्कृष्ट पेपरांची निवड करण्यात येणार आहे.
याप्रसंगी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अॅकॅडेमिक डिन व परिषदेचे समन्वयक प्रा. हेमंत इंगळे व उपसमन्वयक प्रा. विजय डी. चौधरी यांनी परि यशस्वी नियोजन केले. परिषदेच्या सल्लागार समितीमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकीत संशोधकांचे मार्गदर्शन लाभले.
















