नशिराबाद (सुनिल महाजन) जेडीसीसी बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणीताई खडसे- खेवलकर यांच्या वाहनावर काल भ्याड हल्ला झाला. या हल्ल्याचा नशिराबाद राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. आणि नशिराबाद पोलीस निरीक्षक यांना आरोपीवर सक्त कारवाई व्हावी व या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन विनोद रधे, सैय्यद बरकत अली युसुफ अली, चंद्रशेखर पाटील, निलेश रोटे, कल्पेश पाटील, देवेंद्र पाटील, केवल पाटील, भुषण रोटे, अजहरोधीन पिजारी, काजीम अली, युसुफ अली सैय्यद, पुष्कराज रोटे, शशिकांत येवले, पराग कोल्हे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.