मारवड ता. अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथील पाडळसरे निम्नं तापी प्रकल्पातील साडेचार लाखांच्या लोखंडी प्लेटा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी मारवड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, सुमारे ४ ते ५ महिन्या पूर्वी ते दि.२९ डिसेंबर २०२२ च्या दरम्यान lower tapi project padalsare gat no.१३७,village & post प्रोजोक्टचा निम्नं तापी प्रकल्प अंतर्गतत चोरट्याने कळमसरे येथून महाराष्ट्र शासन लोअर तापी मेकिनिकल गेटचे कामासाठी लागणाऱ्या ४ लाख ६४ हजार ९४० रुपयांच्या २८७ लोखंडी प्लेटा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. या प्रकरणी सुपरवायझर दिनेश ज्ञानेश्वर चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला पुढील तपास पोउपनि बाळकृष्ण शिंदे हे करीत आहेत.