नागपूर (वृत्तसंस्था) सज्ञान महिलेनं स्वत:च्या मर्जीने शरीरसंबंध (sex with consent) ठेवल्यास संबंधित पुरुषास बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवलं जाऊ शकतं नाही, असा निर्वाळा नागपूर सत्र न्यायालयाने दिला आहे. तसेच या प्रकरणी आरोपी तरुणाची निर्दोष सुटका (Accused acquitted) केली आहे.
सागर चुन्नीलाल दडुरे असं संबंधित आरोपीचं नाव असून तो महादूला येथील रहिवासी आहे. आरोपी सागर हा खाजगी नोकर आहे. शिक्षण सुरू असताना सागरची ओळख फिर्यादी मुलीसोबत झाली होती. कालांतराने त्यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमसंबंधात झालं. दरम्यानच्या काळात दोघांनी अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. दोघंही एकमेकांसोबत लग्न करणार होते. बरीच वर्षे त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते.
तर बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवलं जाऊ शकतं नाही
पण काही वर्षानंतर आरोपी सागर यानं कुटुंबाच्या विरोधामुळे फिर्यादी मुलीशी विवाह करण्यास नकार दिला. यामुळे फिर्यादीने सागरविरोधात लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. हा खटला नागपूर सत्र न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने आरोपी तरुणाची निर्दोष सुटका केली आहे. सज्ञान महिलेनं स्वत:च्या मर्जीने शरीरसंबंध ठेवल्यास संबंधित पुरुषास बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवलं जाऊ शकतं नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने यावेळी दिला आहे.
सागरचे वकील ॲड. आर. के. तिवारी यांनी फिर्यादीने सहमतीने शरीरसंबंध ठेवले होते. तसेच आरोपीने फसवणूक करण्याच्या उद्देशाने फिर्यादीला लग्नाचं आमिष दिलं नाही, असा युक्तीवादही वकीलाने केला. वकीलाचा हा युक्तीवाद खोटा ठरेल, असा कोणताही पुरावा फिर्यादी पक्षाकडून न्यायालयात देता आला नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केली आहे.
















