TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संस्काराच्या शिदोरीसाठी मनाची बांधणी गरजेची ; अंतर्नादच्या पुष्पांजली प्रबोधनमालेत रवींद्र पाटील यांचे प्रतिपादन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 30, 2021
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) एकत्र कुटुंब पद्धती विभक्त कुटुंब पद्धती पर्यंत पोहोचली आहे. समाजात व्यभिचार वाढत आहे. व्यक्तीची आर्थिक भूक संपायचे नाव घेत नाही.संस्कार हि एक प्रक्रिया आहे जी समाजाकडे बघून शिकता आली पाहिजे. संस्कार घेता आले पाहिजे. जर संस्कार नावाची शिदोरी जमा करायची असेल तर मनाची बांधणी गरजेची असल्याचे प्रतिपादन रवींद्र पाटील यांनी केले. अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ऑनलाईन प्रबोधनमालेचे आज बुधवार रोजी तिसरे व अंतिम पुष्प गुंफण्यात आले.

यावेळी ‘संस्कार काळाची गरज’ या विषयावर विवेक विचार मंचचे प्रांत सदस्य तथा शिवशंभो विचार दर्शनचे उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख व्याख्याते रविंद्र पाटील यांनी संवाद साधला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाइनद्वारे दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन, कर्जत जामखेडचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, नंदुरबारचे उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे तर व्यासपीठावर स्नेहयात्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील यांची उपस्थिती होती.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

अंतर्नाद म्हणजे विचारांची देणे देणारे ठिकाण आहे. वर्षभर विविध सामाजिक उपक्रम अंतर्नादतर्फे राबवले जात असल्याची माहिती योगेश इंगळे यांनी प्रास्ताविकात दिली. दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुर्वेंद्र महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, व्याख्यानमाला अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण त्या विचार, संस्कार, आणि प्रेरणा देतात. सुसंस्कृत समाजासाठी व्याख्यानमाला उपयुक्त असल्याचे ते म्हणाले.

प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी आपल्या मनोगतात प्रबोधनाद्वारे प्रज्वलित मने निर्माण होतील अशी आशा व्यक्त केली. तर समाजाच्या चांगल्या जडणघडणीत अंतर्नादचे खारीचे योगदान असते. चांगले विचार रुजावेत यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे मत वीरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.सकारत्मक विचारांची गरज समाजाला मोठया प्रमाणात आहे आणि ती गरज या प्रबोधनमालेतून पूर्ण होत आहे अश्या भावना नंदुरबारचे उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे याने व्यक्त केल्या.

संस्कार ही काळाची गरज

‘संस्कार ही काळाची गरज आहे’ या विषयावर बोलताना रवींद्र पाटील यांनी, समाजातील तरुण पिढीची भरकटत चाललेली दिशा, वाढलेला भ्रष्टाचार याकडे लक्ष वेधले.विविध थोर महापुरुष संतांची दाखले देत पुढे ते म्हणाले की, सहा विकार काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर याचा जो अंत करतो तोच संत.सहा विकार नष्ट केल्यानंतरच संस्काररुपी सत्पुरुष बाहेर येईल.हा देश माझा आहे आणि त्याच पद्धतीचे आचार, विचार, संस्कार आणि वर्तन आपले असले पाहिजे असे रवींद्र पाटील म्हणाले.

कार्यक्रमासाठी जळगावचे कलारसिक विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शनचे अजय बढे, अमोल जावळे यांचे सहकार्य लाभले. प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर घुले, समन्वयक संजय भटकर, सहसमन्वयक देव सरकटे, राजू वारके, अमित चौधरी, साक्षी भटकर, रचना महाजन, शर्वरी पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी केले तर अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
Next Post

'या' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे होणार जमा ; पण 'ही' चूक टाळा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अयाज मोहसीन यांची इलेक्ट्रॉनिक डिजिटल मिडीया जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड 

April 13, 2025

हरभरा पिकावरील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक सुचना

December 16, 2020

पुण्यात मध्यरात्री ५ प्रवाशांची कार वाहून गेली ; पाचही जणांना वाचवण्यात यश !

August 12, 2022

‘त्या’ घटनेवर ना पंतप्रधान बोलले ना आपले गृहमंत्री : संजय राऊत

January 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group