धरणगाव (प्रतिनिधी) पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जळगाव ग्रामीण मतदार संघातील चार हजारापेक्षा जास्त वारकऱ्यांसाठी आषाढी वारी निमित्त पंढरपूर जाण्यासाठी ५४ मोफत बसेस, खाजगी वाहनासह भोजन, फराळ, आरोग्यसेवेसह पंढरपूर येथे राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, गुलाबभाऊंमुळेच आम्हाला घडले विठूमाऊलीचे दर्शन घडले, अशी भावना व्यक्त करत प्रतापराव पाटलांचे विविध गावात औक्षण करत महिलांकडून आभार मानले जात आहेत.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जळगाव ग्रामीण मतदार संघातील चार हजारापेक्षा जास्त वारकऱ्यांसाठी पंढरपूर जाण्यासाठी ५४ मोफत बसेस, खाजगी वाहनासह भोजन, फराळ, आरोग्यसेवेसह पंढरपूर येथे राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. वारीहून परत आल्यानंतर वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कारण पंढरपूर येथे भोजन, फराळ, आरोग्यसेवेसह राहण्याचीही व्यवस्था खूपच सुव्यवस्थित होती. त्यामुळे वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी आल्या नाहीत.
दरम्यान, माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील हे नेहमी प्रमाणे मतदार संघात भेटीगाठी, द्वारदर्शना जात असतांना त्यांना सुखद अनुभव येत आहेत. गुलाबभाऊंमुळेच आम्हाला घडले विठूमाऊलीचे दर्शन तसेच पंढरपूर येथे करण्यात आलेल्या सोयीमुळे महिला भारावल्या आहेत. त्यामुळे प्रतापराव पाटील हे ज्या ज्या गावात जात आहेत. त्याठिकाणी महिलांकडून औक्षण करत आभार मानले जात आहेत. तसेच पुढील वर्षी देखील विठूमाऊलीचे दर्शन घडवून आणावे, असा आग्रह धरला जात आहे. पाळधी, वसंतवाडी तांडा, जळके, दोनगाव, रेल आदी गावांमध्ये प्रतापराव पाटलांना आभार मानल्याचा सुखद अनुभव आला. दरम्यान, पांडुरंगाच्याच कृपाप्रसादानेच जिल्ह्यातील वारकर्यांची वारीची व विठ्ठलदर्शनाची व्यवस्था करता आली हे आम्ही माझे भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया प्रतापराव पाटील यांनी दिली आहे.