चोपडा (प्रतिनिधी) येथील महावीर नगरातील पंचक्रोशीतील जागृत देवस्थान ॐ सिध्देश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव महिला वर्गाने मोठ्या धुमधडाक्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला.
भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्म उत्सवाचे औचित्य साधत धृपदाबाई धनगर, लक्ष्मीबाई लोहार हयांनी सुश्राव्य भजने म्हटली तर महिला व तरुणींनी गरबा दांडिया नृत्यावर ठेका धरला तद्नंतर सुमारे १२ वाजता “जो बाळा जो जो रे “ची आरती म्हणत लहान बाळांचा पाळणा हलवत श्रीकृष्णाचा पेहराव केलेल्या क्रीष्णा संदीप साळवे या बालकांची पूजा करून मोठ्या धुमधडाक्यात उत्सव साजरा केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ.कावेरी महेश शिरसाठ, सौ.आश्वीनी रोहीत सोनार,सौ.उज्वला संदीप साळवे, योगिता सोपान मराठे, सोनाली भरत राजपूत, मयुरी पीयुष चव्हाण,नंदिनी महेश मराठे, शोभा रतिलाल बडगुजर, रंजना रविंद्र भवराळे, सुलभा रविंद्र सोनवणे, सीमा अशोक सोनवणे, कोकिळा भिकन पाटील,आशा शाम बडगुजर, अश्विनी महाजन, पूजा सोनवणे, देवयानी योगेश मराठे, कल्पना अरुण राजपूत, कोमल सुमित सोनार, ललिता रामचंद्र मासरे, अक्षया सोनवणे, गुड्डी किरण लोहार आदींनी मेहनत घेतली. यावेळी एस.टी कॉलनी, बालाजी नगर, महावीर नगर, रामनगर व सुदर्शन कॉलनीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.