जळगाव (प्रतिनिधी) जैन इरिगेशन तसेच भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने काव्यरत्नावली चौकाची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. या सजावटीला बघण्यासाठी नागरिक भेट देत आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यसंग्रामाचे शिल्पकार महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंह, सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद, राणी लक्ष्मीबाई यासारख्या महनीय नेत्यांचे विचार आणि आजचे संदर्भ याबाबत या सजावटीत समावेश आहे. सुवर्ण महोत्सव स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त केलेली ही सजावट अवश्य बघण्यासारखी आहे. जैन इरिगेशन चे सहकारी जगदीश चावला व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही निर्मिती केली आहे.