जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवकॉलनी परिसरात दारू अड्ड्याजवळ दोघांमध्ये झालेल्या वादातून एकाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. अक्षय अजय चव्हाण (वय-२३ रा.पिंप्राळा) असे मयताचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शिवकॉलनी स्टॉपसमोर दारूच्या अड्ड्यासमोर मोबाईलच्या वादातून दोन तरुणांमध्ये ५.३० च्या सुमारास मोबाईलच्या जुन्या वादातून वाद झाला. वाद वाढल्याने दोन्ही गटातील १०-१५ तरुणांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. यानंतर अक्षय चव्हाण या तरुणाने बाळू पवार नामक तरुणाचं भावाच्या डोक्यात दगड मारला. भावाला मारल्याच्या रागातून बाळू पवार याने चॉपरच्या साहाय्याने अक्षय चव्हाण या तरुणावर वार केले. गंभीर दुखापत झाल्याने अक्षयला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी आणि जिल्हा रुग्णालयात पोलीस दाखल झाले असून संशयिताचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे जळगावात खळबळ उडाली आहे.