जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात शौचास गेलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील एका गावात शौचास जात असतांना पिडीत तरुणीला प्रवीण उर्फ रावसू दिलीप काळे याने मागून पकडले. त्यानंतर तू मला आवडते, माझ्यासोबत शरीर संबंध ठेव, असे बोलून स्त्री मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. एवढेच नव्हे तर, याबाबत कुणाला सांगितले तर तुला सोडणार नाही, असे बोलून पळून गेला. या प्रकरणी प्रवीण उर्फ रावसू काळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. लीलाधर महाजन हे करीत आहेत.