जळगांव: येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने जळगाव शहर महानगरपालिका आणि एन व्ही टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल मीडिया वर सक्रिय तरुणाई साठी रिल्स मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 9 नोव्हेंबर 2024 ते 18 नोव्हेंबर 2024 दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ६० सेकंद लांबीचा शॉर्ट व्हिडिओ तयार करावयाचा असून त्या व्हिडिओ मधून मतदान जनजागृती साठीचा संदेश असणे आवश्यक आहे. ज्या स्पर्धकांकडे रिल तयार करण्यासाठी तांत्रिक गोष्टींची उपलब्धता नाही त्यांच्यासाठी एन व्ही टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस तर्फे व्हिडिओ निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रोफेशनल साधनांची पूर्तता कोणतेही शुल्क न आकारता करण्यात येणार आहे. या मध्ये खालील उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
• प्रोफेशनल ग्रेड व्हीडिओ लाईट
• प्रोफेशनल ग्रेड वायरलेस आणि वायर माइक
• ग्रीन स्क्रीन
• ट्राय पॉड
• आर जी बी लाईट
• रिंग लाईट
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी तयार केलेले रिल आपल्या खात्यावर अपलोड करून जळगाव शहर महानगरपालिकेच्या अधिकृत खात्यांना ( jcmc digital) ला टॅग करावे.
Facebook : www.facebook.com/jcmc.digital
Instagram : www.Instagram.com/jcmc.digital
ज्या स्पर्धकांना मोफत तांत्रिक सहाय्य हवे असेल त्यांनी एन व्ही टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, विठ्ठल शॉपिंग कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, ओंकारेश्वर मंदिराजवळ, जळगाव. याठिकाणी भेट द्यावी किंवा 9373355533 या क्रमांकावर संपर्क साधावा.
निवडणूक प्रक्रिया पुर्ण झाल्यावर मनपा आयुक्त विजेत्यांची निवड करून त्याची घोषणा जळगाव शहर महानगरपालिकेच्या अधिकृत खात्यावरून करतील.
विजेत्यांना खालील प्रमाणे रोख रकमेची आकर्षक पारितोषिक देण्यात येतील
प्रथम पारितोषिक: रु.५००१ रोख
द्वितीय पारितोषिक : रू.३१०० रोख
तृतीय पारितोषिक: रु.२१०० रोख
इतर सर्व सहभगी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येतील.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- स्पर्धकांचे वय १८ वर्ष पुर्ण असावे.
- स्पर्धक जळगाव शहराचा नागरिक असावा.
- व्हिडिओ मध्ये कोणत्याही पक्षाचा किंवा उमेदवाराचा उल्लेख नसावा.
- व्हिडिओ मध्ये अश्लील संवाद किंवा दृश्य नसावीत.
- दोन जाती धर्मात तेढ निर्माण करणारे संवाद, दृश्य नसावे.
- व्हीडिओ मध्ये कोणत्याही मादक पदार्थांचा वापर किंवा प्रचार करू नये
- स्पर्धकाने तयार केलेल्या शॉर्ट व्हिडिओ मधून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यायची असून असे उल्लंघन करणाऱ्या स्पर्धकास स्पर्धेतून बाद करण्यात येईल व कोणत्याही कायदेशीर बाबी साठी स्पर्धक स्वतः जबाबदार राहील. मनपा प्रशासनाची कोणतीही जबाबदारी नसणार आहे यांची नोंद घ्यावी.
- स्पर्धेचे अंतिम निर्णय मा. आयुक्तांकडे राखीव असतील.