जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भुसावळ विकासो मतदारसंघातून आमदार संजय सावकारे यांनी अपेक्षेप्रमाणे विजय संपादन केला आहे.
आज झालेल्या मतमोजणीत आमदार संजय वामन सावकारे यांना २२ तर शांताराम धनगर यांना ४ मते मिळाली. यामुळे संजय सावकारे यांची संचालकपदी निवड करण्यात आली. ते दुसर्यांदा जिल्हा बँकेचे संचालक बनले आहेत. दरम्यान, संजय सावकारे आणि संतोष चौधरी या आजी-माजी आमदारांनी अर्ज भरल्याने येथील लढत चुरशीची होण्याची शक्यता होती. परंतू संतोष चौधरी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती. परंतु तरी देखील ते निवडणुकीच्या बाहेर फेकले गेले होते. तर रमण भोळे यांनी शेवटच्या दिवशी माघार घेतल्यामुळे आमदार संजय सावकारे आणि शांताराम धनगर यांच्यात लढत निश्चीत झाली. परंतू आमदार संजय सावकारे यांनी अपेक्षेप्रमाणे विजय संपादन केला आहे.
















