TheClearNews.Com
Tuesday, November 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

जीवरक्षक ओम पाटीलचे शिक्षणाचे स्वप्न जैन इरिगेशन पूर्ण करणार

vijay waghmare by vijay waghmare
March 24, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, (प्रतिनिधी) : पोहता येत नसतानाही अनेर नदीत स्नानासाठी उतरलेल्या चौघासाठी उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (वय 14 ) हा देवदूत ठरला आहे. ओमच्या या धाडसामुळे चौघांचे प्राण वाचले. जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च करण्यात येणार आहे. तसेच ओम पाटील याचा अतुलनीय धाडसाबद्दल अशोक जैन यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे .

अनेर नदीत गणपूर ( चोपडा ) येथील चार अल्पवयीन मुले ( वय 16 ) आंघोळीसाठी उतरले होते. परंतु या चौघांनाही पोहता येत नसल्याने ते बुडू लागले. त्याचवेळी तिथून जात असलेल्या ओम पाटील याने नदीतील डोहात उडी घेऊन चारही मुलांचे प्राण वाचवून ओम त्यांच्यासाठी देवदूत ठरला आहे. ओम हा गावातील विकास विद्यालयात 8 वी च्या वर्गात शिकत असून गरिबीच्या परिस्थितीत शिक्षण घेत आहे. ओमचे वडील रवींद्र पाटील आणि आई सारलाबाई हे शेतमजुरी करतात. प्लॉट एरियात त्यांचे पत्र्याचे घर असून मोठा मुलगा 11 वीचे शिक्षण घेत आहे. परिस्थिती गरिबीची असल्याने शिक्षण घेताना मुलांना अडचणी येत आहेत. आज माध्यमात ओम यांच्या धाडसाचे आलेले वृत्त पाहून जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांनी वाचले. त्यानंतर ओम याच्या पुढील सर्व शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येण्यात असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

READ ALSO

३० हजार भरल्याने वीजग्राहकास मिळाली २३ हजारांची सूट

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व

कोट…

“संपत्तीच्या गरजेपेक्षा मनाच्या मोठेपणाची आज सर्वात जास्त गरज आहे. जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन तथा श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या या विचारांचा वारसा जैन परिवारावर आहे. संस्कारशील विचारांचा आधार या कार्याला आहे. समाजातील गरजू विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जैन इरिगेशन कायमच अशा मुलांना मदतीचा हात देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे.”

अशोक जैन

अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

३० हजार भरल्याने वीजग्राहकास मिळाली २३ हजारांची सूट

November 16, 2026
अमळनेर

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व

November 16, 2026
जळगाव

कर्मचारी भरतीबाबत सोशल मीडियावर बनावट जाहिरातींचे पेव; महावितरणशी संबंध नाही

November 16, 2026
एरंडोल

आडगाव येथे वैचारिक स्वराज्याचा ‘खान्देश कर्तृत्व पर्व २०२६’ सोहळा दिमाखात संपन्न

November 16, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 16, 2026
गुन्हे

शाम नगरातील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

November 16, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संस्काराच्या शिदोरीसाठी मनाची बांधणी गरजेची ; अंतर्नादच्या पुष्पांजली प्रबोधनमालेत रवींद्र पाटील यांचे प्रतिपादन

December 30, 2021

दिशादर्शक फलक चुकीच्या ठिकाणी लावल्याने प्रवाशांना मनस्ताप ; चंदन पाटील यांचा आंदोलनाचा इशारा !

September 21, 2021

जि.प., पं.स.च्या गट आणि गण रचनेबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली ‘ही’ महत्वपूर्ण माहीत !

May 26, 2022

कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय ; ठाण्यातील वृद्धाश्रमात ६७ जणांना कोरोनाची लागण

November 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group