TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्हा दुध संघ निवडणूक : जाणून घ्या…माघारीनंतरअंतिम उमेदवारांची यादी !

जाणून घ्या...कोणत्या होणार तालुका निहाय हायव्होल्टेज राजकीय लढती !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 28, 2022
in जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आज माघारीच्या अंतिम दिवसानंतर जळगाव जिहा दुध संघ निवडणुकीत रिंगणात उरलेले अंतिम उमेदवारांची यादी स्पष्ट झाली आहे. यामुळे आज हायव्होल्टेज राजकीय लढती स्पष्ट झाल्या आहेत. या निवडणुकीत अनेकांचे राजकीय भवितव्य दाववर लागले आहे.

जाणून घ्या… तालुका निहाय अंतिम उमेदवारांची यादी
जिल्हा दुध संघात दुध उत्पादक शेतकरी प्रतिनिधींचा जरी ठराव झाले असले तरी २० जागांवर लोकप्रतिनिधींनी उमेदवारी दाखल केल्याने जिल्हा बॅँक प्रमाणे दुध संघात देखील खरा दुध उत्पादक प्रतिनिधी निवडणुकीच्या रिंगणबाहेरचं राहिल्याचे चित्र आहे. अनु. जाती जमाती मतदार संघात आमदार संजय सावकारे यांच्या विरुध्द श्रावण सदा ब्रम्हे यांची उमेदवारी आहे. इमाव मतदार संघात राष्टवादी कॉँग्रेस पक्षातर्फे पराग वसंतराव मोरे तर भाजपा प्रणित पॅनलतर्फे गोपाळ रामकृष्ण भंगाळे यांच्यात सरळ लढत होणार आहे. महिला राखीव मतदारसंघात छाया गुलाबराव देवकर, सुनिता राजेंद्र पाटील, मनिषा अनंतराव सुर्यवंशी, उषाबाई विश्वासराव पाटील, पुनम प्रशांत पाटील या पाच उमेदवार रिंगणात असून भाजपातर्फे पुनम पाटील किंवा सुनिता पाटील यांच्यापैकी एक उमेदवार निश्चीत होणार आहे. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे छायाताई गुलाबराव देवकर यांची उमेदवारी कायम राहणार आहे. विमुक्त जमाती मतदारसंघात राष्टवादी कॉँग्रेसतर्फे विजय रामदास पाटील व भाजपातर्फे अरविंद भगवान देशमुख यांच्यात लढत होईल.

READ ALSO

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

अमळनेर तालुका मतदारसंघात राष्टवादी कॉँग्रेसतर्फे आ. अनिल भाईदास पाटील तर भाजपातर्फे माजी आमदार स्मिता उदय वाघ यांच्यात लढत होईल. एरंडोल मतदारसंघात भागचंद मोतीलाल जैन विरुध्द दगडू चौधरी, चाळीसगाव मतदार संघात प्रमोद पाटील विरुध्द सुभाष नानाभाऊ पाटील, चोपडा मतदारसंघ इंदिराताई भानुदास पाटील विरुध्द रोहित दिलीप निकम, धरणगाव तालुका मतदारसंघात संजय पवार विरुध्द वाल्मिक पाटील, बोदवड तालुका मतदार संघात ॲड रविंंद्र पाटील विरुध्द मधुकर राणे, भडगाव तालुका मतदारसंघात रावसाहेब भोसले विरुध्द डॉ संजीव पाटील, भुसावळ तालुका मतदारसंघात शामल झांबरे विरुध्द शालीनी ढाके, यावल तालुका मतदारसंघात हेमराज चौधरी विरुध्द नितीन चौधरी तर रावेर तालुका मतदारसंघात जगदीश बढे विरुध्द ठकसेन भास्कर पाटील यांची उमेदवारी आहे.

जाणून घ्या… कोणत्या होणार हायव्होल्टेज लढती !
पारोळा तालुका मतदारसंघात आमदार चिमणराव पाटील यांच्याविरुध्द माजी मंत्री डॉ सतिष पाटील यांच्यात लढत होणार असून ही लढत पारंपारिक असून दोघं नेत्यांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरुध्द माजी उपमहापौर सुनिल महाजन यांच्या आई मालतीबाई सुपडू महाजन यांची उमेदवारी कायम आहे. सहकाराच्या राजकारणात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदा नशीब आजमावत आहेत. त्यामुळे ही लढत देखील लक्षवेधी ठरणार आहे. जामनेर तालुका मतदारसंघात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुध्द दिनेश रघुनाथ पाटील यांची उमेदवारी असल्याने ना. महाजन यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची असणार आहे. यात सगळ्यात मोठी आणि हायव्होल्टेज लढत ही मुक्ताईनगर मतदार संघात मंदाताई एकनाथराव खडसे आणि आणि मंगेश रमेश चव्हाण यांच्यात लढत होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

Horoscope Today : राशीभविष्य, मंगळवार २९ नोव्हेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तालुका रेशन दुकानदार‎ संघटनेचे तहसीलदारांना निवेदन‎ !

July 5, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार २४ नोव्हेंबर २०२२ !

November 24, 2022

पिंप्री खु येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवनिमित्ताने अभ्यासिकाचे उदघाटन

April 14, 2021

भुसावळमधील मोबाईल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील चौघांना अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

January 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group