पारोळा, भडगाव, जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बलात्काराच्या तीन वेगवेगळ्या घटनांनी हादरला आहे. जिल्ह्यातील तीन वेगवेळ्या पोलीस स्थानकात बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. यात लग्नाचे आमिष दाखवून दोघींवर बलात्कार करण्यात आला तर तिसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आहे.
पारोळा : लग्नाचे अमीष दाखवून मध्य प्रदेशासह वेगवेळ्या ठिकाणी बलात्कार
पारोळा तालुक्यातील एका गावातील पिडीतेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ९ मार्च २०२२ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पीडिता वडिलांच्या झोपडीत झोपली होती. यावेळी डिगंबर मधुकर पाटील याने लग्नाचे अमीष दाखवून मोटार सायकलवर सेंधवा (मध्यप्रदेश) येथे घेवून गेला. तेथे त्याच्या ओळखीच्या नाजू नामक व्यक्ती घरी नेले. याठिकाणी डिगंबर पाटील याने ८ दिवस वेळोवेळी शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर अमळनेर तालुक्यातील एका गावातील नातेवाईकांकडे गेल्यावर तू वेगळ्या जातीची आहे, मी वेगळ्या जातीचा आहे. तसेच तुझे ऑपरेशन देखील झाले, असे सांगून पिडीतेसोबत लग्न करण्यास नकार दिला. तसेच काहीतरी कागदपत्र बनवून पिडीतेचा अंगठा घेत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पिडीतेला तेथून पुन्हा सेंधवा येथे नेले आणि पिडीतेला काहीएक न सांगता तेथून निघून गेला. पिडीतेने तेथील घरमालकाला विनंती करत दोन महीने राहिली. त्यानंतर पारोळा पोलीस स्थानकात डिगंबर पाटील विरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास अमळनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे करीत आहेत.
जळगाव : लग्नाचे अमीष दाखवून चार वर्षापासून जबरदस्ती बलात्कार
जळगावातील रामनंद पोलीस स्थानकात पिडीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जळगाव शहरातील एका भागात भाड्याने फ्लॅट घेऊन विशाल राजेश तडवी (वय २३ रा. यावल) याने पिडीतेसोबत दि. २८ ऑक्टोबर २०१८ ते आज पावेतो लग्नाचे आमीष दाखवून वेळोवेळी जबरदस्ती बलात्कार केला. पैशाची मागणी करुन मारहाण आणि शिवीगाळ केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विशाल तडवी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो उप.नि. गोपाल देशमुख हे करीत आहेत. दरम्यान, संशयित आरोपी विशाल तडवीला अटक करण्यात आली आहे.
भडगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; अश्लील फोटो काढून केले व्हायरल !
भडगाव पोलीस स्थानकात अल्पवयीन पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २१ मार्च २०२२ रोजी हिंदीचा पेपर झाल्यावर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कृष्णा चौधरी व त्याचा मित्र बंटी या दोघांनी पिडीतेस बरबाद करू अशी धमकी देत जबरदस्ती गाडीवर जबरदस्तीने बसवून एका लॉजवर नेले. याठिकाणी कृष्णा चौधरी याने पिडीतेस ग्लास भर पाणी पिण्यास दिले आणि त्यानंतर पिडीतेवर बलात्कार केला. तसेच पिडीतेचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल केले. याप्रकरणी कृष्णा चौधरी (पूर्ण नाव माहित नाही), बंटी (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. नि अशोक उतेकर हे करीत आहेत.