जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील ३९ वर्षीय व्यक्तीची केवायसी अपडेटसाठी आलेल्या संदेशला क्लिक करताच १ लाख ९० हजाराची फसवणूक झाली आहे, या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालूक्यातील चिंचोली येथील रहिवासी प्रमोद नामदेव पाटील(वय ३९) हे खाजगी नोकरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दि २७ रोजी त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खाते नंबरला इंटरनेट बँकिंग करीत असतांना मोबाईलवर त्यांना अपडेटसाठी एक संदेश आला. यावेळी ओटीपी ओपन झाल्याबर त्यांच्या खात्यातून तब्बल १ लाख ९० हजार रुपये कपात झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोउनी अनिश शेख हे करीत आहेत.