जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या ग.स. सहकारी सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे. दि. १८ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरवात होणार असुन दि. २१ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने पारीत केलेल्या आदेशात म्हटले आहे.
गुरुवारी जिल्ह्यातील २०४ सहकारी संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. ग.स. सोसायटीसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केले आहे. १८ नोव्हेंबरपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. याआधीच १३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ८३ सहकारी संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आला आहे.
ग. स. चा कार्यक्रम
नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती – १८ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर
छाननी – २६ नोव्हेंबर
वैध यादी प्रसिद्धी – २९ नोव्हेंबर
माघार – २९ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर
अंतिम यादी – १४ डिसेंबर
मतदान – २१ डिसेंबर
मतमोजणी – २३ डिसेंबर
पदाधिकारी निवड – ३१ डिसेंबर
बाजार समित्यांच्या निवडणूका जाहीर
राज्यातील २५८ बाजार समित्यांसह जिल्ह्यातील बारा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे. बाजार समित्यांच्या निवडणुका २३ ऑक्टोबरपासून पुढील तीन महिन्यात घेण्याचे आदेश दिले आहे.
















