जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या दोन लॉजवर पोलिसांनी गुरुवारी धाड टाकली होती. यावेळी लॉजवर तब्बल 13 जोडपी पोलिसांना आक्षेपार्ह अवस्थेत मिळून आली होती. यावेळी पोलिसांनी लॉज मालक दलालांनाही ताब्यात घेतले होते. याप्रकरणी रात्री उशिरा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन लॉजजवर अनैतिक प्रकार सुरु असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश देशमुख यांच्यासह पथकाने धाड टाकली. सागर हॉटेल व लॉज येथे 3 मुली व 3 मुले तर हेरंब पॅलसे या ठिकाणी 9 मुली व 9 मुलं मिळून आली. यात काही मुली वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. तर काही मुली परप्रांतीय आहेत. त्या जळगावात स्थायिक झालेल्या आहेत. एका ठिकाणी दलालाच्या माध्यमातून मुली पुरविण्यात आल्याचे उघड झाले आहे. परंतू आपण आपल्या मर्जीने आल्याचे या मुलींनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील विविध महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या या मुली एका दलालाच्या संपर्कात असल्याचे कळते. त्या माध्यमातून त्यांचा वैश्या व्यवसायासाठी वापर केला जात असल्याचे कारवाईत उघडकीस आले. तर काही तरुण परप्रांतीय आहेत.
मुंबईतील दोन महिलाही लॉजमध्ये असल्याचे आढळून आल्याची चर्चा आहे. वैश्या व्यवसायात महाविद्यालयीन मुली मिळुन आल्यामुळे पोलिसही चक्रावले आहे. दरम्यान, या प्रकरणी स्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 चे कलम 3 नुसार कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 3200 रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत. या दोन्ही गुन्ह्याचा पुढील तपास रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पो.नि. विजय शिंदे करत आहेत.