धरणगाव (प्रतिनिधी) अल्पावधीत धरणगावात लोकप्रिय झालेले पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांची मुक्ताईनगर येथे तर मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक खेताड यांची धरणगावला बदली झाली आहे. जिल्ह्यातील एकूण चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात दोन बदल्या विनंतीवरून तर दोन बदल्या प्रशासकीय कारणावरून करण्यात आल्या आहेत.
पारोळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष नारायण भंडारे यांची जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे तर जळगाव जिल्हापेठचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांची पारोळा पोलिस निरीक्षकपदी बदली करण्यात आली. जळगाव नियंत्रण कक्षातील राहुल सोमनाथ खताळ यांची धरणगाव पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे तर धरणगावचे शंकर विठ्ठल शेळके यांची मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी स्वप्नील शिंपी हत्याकांड आणि बालिका अत्याचार प्रकरणासारख्या इतरही अनेक संवेदनशील प्रकरण अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने हाताळल्यामुळे ते धरणगावात चांगलेच लोकप्रिय झाले होते.