जळगाव (प्रतिनिधी) कौटुंबिक वादासह दारुच्या व्यसनातून नराधाम बापाने ७ वर्षाच्या पोटच्या गोळ्याचा बांभोरी पुलाखालील नदीपात्रात गळा आवळून खून करणाऱ्या नराधम संदीप यादव चौधरी (मूळ रा. करणखेडा ता. अमळनेर, ह.मु. हिरागौरी पार्क, निमखेडी) बापाला गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायाधीश एम. क्यु. एस. एम. शेख यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.
शहरातील निमखेडी शिवारातील हिरागौरी पार्क येथे संदीप चौधरी हा पत्नी नयना आणि मयत मुलगी कोमल चौधरी (वय ७) यांच्यासह वास्तव्याला होता. संदीप चौधरी याला दारू पिण्याचे व्यसन असल्याने तो नेहमी दारुच्या नशेत राहत होता. दि. ८ दिली होती. जानेवारी २०२० रोजी सकाळी दारू पिण्याच्या कारणावरून पत्नी नयना चौधरी यांना मारहाण केली होती. यावेळी त्यांची मुलगी पप्पा मम्मीला मारु नका असे बोलली होती. त्याचा राग मनात संदीप चौधरी याच्या मनात होता. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता नयना चौधरी यांनी मुलगी कोमल हिला शिकवणीला सोडले. त्यानंतर संदीप चौधरी हा शिकवणीतून चिमुकलीला परस्पर सोबत घेवून गेला. रात्रभर तो मुलीला घेवून घरी परत न आल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी तालुका पोलिसात मुलगी व पती हरविल्याची तक्रार दिली होती.
संदीप चौधरी याने मालकाला त्याने मॅसेज करुन मी मुलीला बांभोरी पुलाखाली मारुन टाकले असून मी आत्महत्या करीत असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार लागलीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तेथून कोमल हीचा मृतदेत ताब्यात घेतला होता. याप्रकरणी संदीप चौधरीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन तालुका पोलीस ठाण्याचे पो. नि. रविकांत सोनवणे, वासुदेव मराठे यांनी करीत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
हा खटला जिल्हा न्यायलयाचे सत्र न्यायाधीश एम.क्यू. एस. एम शेख यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षाकडून १२ साक्षिदारांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मुलीची आई, आरोपीचे मालक, शिकवणी घेणारी शिक्षीका यांच्यासह इतरांची साक्षीदारांसह सादर केलेल्या पुराव्या आधारे न्यायमुर्ती शेख यांनी आरोपी संदीप चौधरी याला दोषी ठावून आजन्म कारावास आणि ५ हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी कामकाज बघितले.