मुंबई / जळगाव प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक नकाशावर नवी क्रांती घडवणारा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. जळगाव MIDC ला D+ झोनमध्ये समाविष्ट करण्यास तसेच विदर्भ मराठवाडा च्या धर्तीवर औद्योगिक प्रोत्साहन मिळण्यास शासनाची औपचारिक मान्यता देण्यात आली असून, जिल्ह्यातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांसाठी ही एक मोठी दिलासादायक घोषणा ठरली आहे अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
या महत्वपूर्ण निर्णयासाठी गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्री गुलाबराव पाटील सातत्याने पाठपुरावा करत होते. तसेच केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे उद्योजकांना दिलासा मिळाला मिळणार आहे. मंत्रालयातील अनेक बैठकींमधून, तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत जळगावमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत D+ झोनच्या प्रस्तावावर चर्चा झाली होती. त्यावेळी उद्योगमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत आश्वासन दिले होते.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांचे आभार
या निर्णयानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, “जळगाव MIDC ला D+ झोनचा दर्जा देऊन विदर्भ मराठवाडा च्या धर्तीवर जळगाव ला औद्योगिक प्रोसाहाने देण्यात येणार आहे.जळगावच्या औद्योगिक भविष्यास नवी दिशा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मनःपूर्वक आभार मानतो. या निर्णयामुळे जिल्ह्यात अभूतपूर्व औद्योगिक गुंतवणूक होईल.” मंत्रालयीन बैठका व चर्चासत्रे, उद्योग विभागाशी सातत्यपूर्ण संवाद – अशा अनेक पाठपुराव्यांनंतर आजचा ऐतिहासिक निकाल जळगाव जिल्ह्याच्या हातात आला आहे. ग्रामीण व उपनगरी भागात औद्योगिक पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल
जळगावचा औद्योगिक कणा मजबूत करण्यासाठी हा निर्णय दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. लॉजिस्टिक, वेअरहाउसिंग व उत्पादनक्षेत्रात गुंतवणूक, MSME व स्टार्टअप्ससाठी अनुकूल वातावरण, निर्यातक्षम उद्योगांना चालना, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी होणार सल्याने औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, “हा निर्णय जळगावच्या औद्योगिक प्रगतीचा गेम चेंजर ठरेल.















