जळगाव (प्रतिनिधी) एरंडोल येथील स्वीफ्ट कार चालकाच्या वाहनाला ओव्हरटेक करुन गाडी थांबवत मारहाण करुन कार हिसकावुन तीन भामटे पसार झाल्याची घटना घडली हेाती. दरम्यान, कारसह ७ लाख ९० हजार रुपये लूटून पसार झालेल्या टोळीतील म्होरक्याला जळगाव एमआयडीसी पोलिसांनी भोपाल (मध्यप्रदेश) येथून अटक केली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, तुकाराम दिनकर पाटिल ऊर्फ मोघ्या (वय-२९) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. एरंडोल येथील स्वीफ्ट कार चालक नाना नथ्थु पाटील यांच्या वाहनाला ओव्हरटेक करुन गाडी थांबवत मारहाण करुन कार हिसकावुन तीन भामटे पसार झाल्याची घटना ७ मार्चच्या मध्यरात्री घडली हेाती. एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल या गुन्ह्यात १४ मार्च रोजी गुन्हेशाखेच्या पथकाने दिपक साहेबराव पाटिल ऊर्फ डासमार्या अप्पा (वय-२३रा.सामनेर, पाचोरा) याला अटक केली हेाती. त्याच्या टोळीचा म्होरक्या सोनू मात्र तेव्हा पासून फरार होता. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना संशयीताची गुप्त माहिती मिळाल्यावर पोलिस नाईक गणेश शिरसाळे, मुकेश पाटील, हेमंत पाटील अशांनी मध्यप्रदेशातील भोपाळ गाठून संशयिताला अटक केली आहे. सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे यांनी संशयीताला आज न्यायालयात हजर केले असता त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.