पाचोरा (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा दूध संघाचा नवनियुक्त प्रशासक मंडळाचा जोरदार कारभार सध्या सुरू झाला आहे. आज प्रशासक मंडळातील तीन प्रशासकांनी पाचोरा चिलिंग सेंटरला प्रशासक मंडळाची सरप्राईज भेट देत पाहणी केली.
जळगाव जिल्हा दूध संघाचा नवनियुक्त प्रशासक मंडळांतील तीन संचालकांनी पाचोरा येथील चिलिंग सेंटरला सरप्राईज भेट देऊन चिलिंग सेंटरच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी आढळलेल्या त्रुटी संदर्भात अध्यक्ष मंगेश चव्हाण यांना दरमहा चिलिंग सेंटरला येणार वीज बिल वाचवण्याबाबत सोलर प्लांटबाबतचा प्रस्ताव प्रशासकांनी मांडला. तसेच दूध संघाला येणाऱ्या दुधात या महिन्यात जी कमतरता आढळली, त्यात आठ दिवसात पाच हजार लिटर दुधाचे संकलन वाढवण्याच्या सक्त सूचना सेन्ट्रलला देण्यात आल्या आहेत. यावेळी प्रशासक अरविंद देशमुख यांच्यासह इतर प्रशासक हजर होते.