जळगाव (प्रतिनिधी) सायबर ठगांनी जळगाव जिल्ह्यातील दोघांना गंडवून उकळलेले ६९ लाख रूपये परत मिळविण्यात जळगाव सायबर पोलिसांना यश मिळाले आहे. जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी एक पत्रिका परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. धक्कादायक म्हणजे यातील एका सेवानिवृत्त क्लर्कला तब्बल सात दिवस डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात आले होते.
एकूण 69 लाख रुपये परत मिळविण्यात जळगाव पोलिसांना यश !
सेवानिवृत्त क्लार्क राजेंद्र गरुड यांना मनी लॉन्ड्रीग केल्याचे सांगून सायबर ठगांनी अठरा लाखात ऑनलाईन गंडवले होते. जळगाव सायबर पोलिसांनी 18 लाख पैकी 17 लाख रुपये तक्रारदाराला परत मिळवून देण्यात यश मिळविले. दुसऱ्या घटनेत संतकुमार उईके यांच्याकडून उकळलेले एक कोटी पैकी ५२ लाख असे एकूण 69 लाख रुपये परत मिळविण्यात जळगाव पोलिसांना यश आले आहे.
सात दिवस डिजिटल अरेस्ट !
राजेंद्र गरुड यांना सायबर ठगांनी तब्बल सात दिवस डिजिटल अरेस्ट केले होते. व्हिडिओ कॉलमध्ये कोर्ट, सायबर पोलीस स्टेशनचा देखावा तयार करून गरुड यांना प्रचंड धमकविण्यात आले. भेदरलेल्या गरुड यांनी अखेर एका बँक खात्यावर पैसे जमा केले. सायबर पोलिसांनी संबंधित बँक खाते गोठविले. जळगाव सायबर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अखेर गुरुवारी सायंकाळी राजेंद्र गरुड यांना 18 पैकी 17 लाख रुपये परत मिळाले. यावेळी आयुष्यभराची कमाई परत मिळाल्यानंतर गरुड यांनी जळगाव पोलीस दलाचे आभार मानले.